नवी दिल्ली : कोविशील्ड (Covishield) वरील लस धोरणाने वेढलेल्या यूकेने अखेर मोठा बदल केला आहे. यूकेने आता भारत निर्मित कोविशील्डला मान्यताप्राप्त लस म्हणून स्वीकारले आहे. यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
यूके सरकारकडून असे म्हटले गेले आहे की जर एखाद्या भारतीयाने कोविशील्डची कोरोना लस घेतली असेल आणि यूकेला गेला असेल तर त्याला क्वारंटाईन राहणं आवश्यक आहे. यूके सरकारने सांगितले की, 'प्रमाणपत्र' चा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे.
यूकेची नवी गाईडलाईन 4 ऑक्टोबरपासून लागू केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या या गाईडलाईन्समध्ये कोविशील्ड लसीला मान्यता देण्यात आली नव्हती. ज्याबद्दल वाद होता. आता नवीन गाईडलाईन्समध्ये कोविशिल्डचे नाव जोडले गेले आहे. ताज्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये अॅस्ट्रॅजेनिका कोविशील्ड, अॅस्ट्राजेनिका व्हॅक्सजेवेरिया, मॉडर्ना टाकेडा लस म्हणून मंजूरी देण्यात येत आहे.'
त्यात पुढे म्हटले आहे की ऑक्सफर्ड/अॅस्ट्राजेनिका, फायझर बायोटेक, मॉडर्ना आणि जॉन्सन लसींना मान्यता देण्यात आली आहे. ही लस ऑस्ट्रेलिया, अँटिगा आणि बार्बुडा, बार्बाडोस, बहरीन, ब्रुनेई, कॅनडा, डोमिनिका, इस्रायल, जपान, कुवेत, मलेशिया, न्यूझीलंड, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया किंवा तैवानमधील संबंधित सार्वजनिक आरोग्य संस्थेची असणे आवश्यक आहे.
भारताचा यूकेला इशारा
मंगळवारी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी ब्रिटनला इशारा दिला की, 'नव्या प्रवासाबाबतच्या गाईडलाईन्समध्ये भारतीयांच्या चिंता दूर केल्या गेल्या नाहीत तर भारत देखील असंच पाऊल उचलू शकतो.'