उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly) येथे एका महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी असे सांगितले की, दोघा नवरा-बायकोमध्ये नेहमीच भांडणं होत असे. पोलीस या
प्रकरणावर कसुन चौकशी करत आहे.
बरेली येथे सापडला महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह
उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका महिला कॉन्स्टेबलचा (female police constable) मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. महिला कॉन्स्टेबल बागपतची रहिवासी आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी असे सांगितले की,
महिलेचा नवरा मिलेट्रीमध्ये (Military) तैनात आहे. दोघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून वादविवाद चालू होते. महिलेच्या चेहऱ्यावर बऱ्याच ठिकाणी जखमा देखील आहेत.
घटनेची माहिती मिळताच मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज म्हणाले की, प्रथमदर्शनी असे दिसते की महिलेवर हल्ला झाला आहे, परंतु शवविच्छेदनाचा रिपोर्ट (Report) आल्यानंतरच काही गोष्टी स्पष्ट होतील.
बागपत इथे राहणारी रहिवासी महिला ज्यांचे नाव शिखा आहे. 2019च्या बॅचला महिला पोलीस शिपाई या पदावर तैनात (Constable) झाल्या होत्या. पोलीसांनी महिलेच्या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. एसएसपी
सत्यार्थ अनिरुद्ध पंकज म्हणाले की, महिलेच्या कुटुंबीयांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल.
एसएसपी ने सांगितले की, घटनास्थळी पाहिल्यावर पती-पत्नीमध्ये काही वाद झाल्याचे दिसते. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये भांडण झाले होते हे नाकारुन चालणार नाही. कुटुंबीयांनी असे सांगितले की, तिच्या चेहऱ्यावर जास्त
जखमा होत्या. पोलीस या प्रकरणावर चौकशी (inquiry) करत आहेत. लवकरच सत्य पुढे येईल अशी आशा देखील कुंटुबीय करत आहेत.