नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार 'आम आदमी पक्ष' (आप) पुन्हा एकदा बहुमत मिळवून सत्तास्थापन करेल, असे चित्र आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर हे दिल्लीतील 'आप'च्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांची संयुक्त जनता दलातून (जेडीयू) हकालपट्टी करण्यात आली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) मुद्द्यावरून प्रशांत किशोर यांनी सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेतली होती. मात्र, बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप हे एकत्र सत्तेत आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांची टीका 'जेडीयू'साठी अडचणीची ठरत होती. बिहार विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, यासाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव निर्माण झाला होता. यानंतर प्रशांत किशोर यांनी CAA च्या मुद्द्यावरून थेट नितीश कुमार यांना लक्ष्य केल्याने त्यांची 'जेडीयू'तून हकालपट्टी झाली होती.
दिल्लीचा गड येणार, पण सिंह.?? मनिष सिसोदिया पिछाडीवर
Delhi Chief Minister Arvind Kejriwal and Political Strategist Prashant Kishor at AAP party office pic.twitter.com/Lxx4fbdMM7
— ANI (@ANI) February 11, 2020
दरम्यान, मतमोजणीच्या चार तासांनंतर आप दिल्ली विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला आप ५८ आणि भाजप १२ जागांवर आघाडीवर आहे.