नवी दिल्ली : कोरोनापासून बचावाचा एकमात्र पर्याय म्हणजेच लस होय. काही लोक अजूनही याने काही साईडइफेक्ट तर नाही ना होणार याबाबत भीती व्यक्त करतात. अशातच लस घेण्याआधीच पेन किलर्स घेतात. अशा लोकांना तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पेन किलर्स फक्त लस घेतल्यानंतर त्रास होत असेल तरच घ्यावी. पेन किलर फक्त सूज कमी करणे किंवा इतर त्रास कमी करण्यासाठी वापरली जाते. यामध्ये सर्वात सामान्य औषध हे पॅरासिटामॉल आहे.
या पेन किलर्सला नियमित घेणे देखील योग्य नाही. अनेक अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, पेन किलर औषधं नियमित घेतल्याने हृदयविकाराचा त्रास होत नाही. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लस लावल्यानंतर त्रास झाला तरच पेन किलरचा वापर करावा. लस घेण्याआधी चुकूनही पेन किलर घेऊ नका. त्यामुळे लसीच्या परिणामकारतेवर परिणाम होऊ शकतो. WHO ने देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
लस घेण्याआधी पेन किलर घेतल्याने लसीच्या प्रती इम्युन रिस्पॉन्स कमी होतो. खरे तर यासंबधी अद्याप पुरेसे पुरावे नसले तरी, लस घेण्याआधी पेन किलर घेतल्याने नुकसानही होऊ शकते किंवा नाही. कारण प्रत्येक व्यक्तीवर याचा वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेतलेली बरी.