Credit Card Bill: क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकले आहात का? या मार्गाने भरा रक्कम

नोकरी करणाऱ्या लोकांना महिन्याचा पगार अनेकदा पुरत नाही. गरज आणि महिन्याची मिळत याची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. अशा स्थितीत अनेक जण पर्सनल लोन किंवा क्रेडीट कार्ड (Credit Card) घेतात.

Updated: Oct 2, 2022, 04:53 PM IST
Credit Card Bill: क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकले आहात का? या मार्गाने भरा रक्कम title=

Credit Card Tips: नोकरी करणाऱ्या लोकांना महिन्याचा पगार अनेकदा पुरत नाही. गरज आणि महिन्याची मिळत याची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. अशा स्थितीत अनेक जण पर्सनल लोन किंवा क्रेडीट कार्ड (Credit Card) घेतात. क्रेडीट कार्डधारक निर्धारित मर्यादेनुसार खरेदी करू शकतात. बिलाची सायकल पूर्ण झाल्यावर महिन्याकाठी बिल भरावं लागतं. काही जण शोक म्हणून स्वत:जवळ क्रेडिट कार्ड बाळगतात. पण कधी कधी ही सवय महागात पडते. बिल भरण्यात खूप अडचणी येतात. अशा स्थितीत अनेक बिले एकापाठोपाठ एक थकीत राहतात आणि बँकवाले फोन करून त्रास देतात. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर या पद्धतीने क्रेडिट कार्डची थकबाकी भरू शकता.

पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डची किमान रक्कम भरत राहा. यामुळे तुमचे CIBIL चांगले राहते आणि बँकेच्या दृष्टीने तुम्ही विश्वासू ग्राहकासारखेच राहता. याशिवाय बँक तुम्हाला वारंवार पैसे भरण्यासाठीही त्रास देत नाही.

जर तुम्ही बिल अजिबात भरण्यास सक्षम नसाल तर  तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून आगाऊ पैसे काढू शकता. 3 दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यात येतात. या पैशातून तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता.तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल. परंतु यानंतर क्रेडिट कार्ड वापरू नका. जोपर्यंत तुम्हाला बिल भरण्यास सक्षम होत नाही, तोपर्यंत क्रेडीट कार्ड दूरच ठेवा.

Online Scam: Smartphone मागवल्यानंतर साबण, दगड मिळणार नाहीत! फक्त साईटवर करा छोटीसी सेटिंग

तुमचे क्रेडिट कार्ड बिल खूप जास्त असेल आणि  थकबाकी भरू शकत नसाल तर बँकेसोबत संवाद साधा. अशा परिस्थितीत तुम्ही बँकेकडून सेटलमेंट करू शकता. यामुळे तुमचा CIBIL स्कोअर पूर्णपणे कमी होईल, परंतु यामध्ये तुम्हाला निम्म्याहून कमी थकबाकी भरावी लागेल.