'भारत माता की जय' म्हटल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही; दारुल उलुमचा नवा फतवा

घोषणा दिल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही

Updated: Jan 25, 2019, 04:56 PM IST
'भारत माता की जय' म्हटल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही; दारुल उलुमचा नवा फतवा title=

लखनऊ: वादग्रस्त नियम आणि फतव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दारूल उलुम देवबंद या संस्थेने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवा फतवा जारी करून वादाला तोंड फोडले आहे. यामध्ये प्रजासत्ताक दिनाला 'भारत माता की जय' ही घोषणा किंवा 'वंदे मातरम्' हे गीत गाण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. यामुळे देशभक्ती सिद्ध होत नसल्याचेही या फतव्यात म्हटले आहे. या फतव्याववरून वादाला तोंड फुटले आहे. 

'भारत माता की जय' घोषणा देणे इस्लामविरोधी आहे. इस्लाम धर्मात केवळ अल्लाची प्रार्थना केली जाते. 'भारत माता की जय' बोलताना तुमच्या डोळ्यांसमोर विशिष्ट प्रतिमा येते. त्यामुळेच मुस्लिमांनी ही घोषणा देता कामा नये. त्याऐवजी मुस्लिमांनी 'हिंदुस्तान जिंदाबाद' अशा घोषणा द्याव्यात. त्यामुळे आपल्यातील देशभक्ती जिवंत राहील, असे जामिया हुसैनिया मदरसाचे मुफ्ती तारिक कासमी यांनी म्हटले. 

आता, महिला टीव्ही अँकर्ससाठीही 'देवबंद'चा फतवा

काही दिवसांपूर्वी दारुम उलुम देवबंदने असाच एक वादग्रस्त फतवा जारी केला होता. यामध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. यादिवशी घराबाहेर पडल्यास मुस्लीम विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करावा लागेल. त्यांचा छळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे दारुम उलुम देवबंदने फतव्यात म्हटले होते. 

'महिलांनी आयब्रो करणे किंवा केस कापणे हे धर्मविरोधी'