नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्या अडचणी आणखी वाढ झाली आहे. ईडीने सत्येंद्र जैन यांच्या पत्नी पूनम जैन यांना समन्स बजावलं आहे. पूनम जैन यांना पुढील आठवड्यात 14 जुलैला ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूनम जैन यांच्यावर मनी लाँड्रिंगमध्ये प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका ठेवत इडीने समन्स पाठवल्याचं समजतंय. (ed has issued summons to delhi minister satyendar jain wife poonam jain next week in connection with a money laundering probe)
सत्येंद्र जैन यांना हवाला प्रकरणात 30 मे ला ईडीने चौकशी केली. ही चौकशी अनेक तास चालली. अनेक तासांच्या चौकशीनंतर सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जैन यांच्यावर बनावट कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार केल्याचा आरोप आहे.
सत्येंद्र जैन यांना करण्यात आलेली अटक ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली आहे. तसेच ही अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल म्हणाले होते. आमचं सरकार आणि आम आदमी पक्ष अतिशय प्रामाणिक आहे. आम्ही भ्रष्टाचार सहन करत नाही, असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं होतं.
Enforcement Directorate has issued summons to Delhi Minister Satyendar Jain's wife Poonam Jain next week in connection with a money-laundering probe: ED official
— ANI (@ANI) July 8, 2022