Knowledge: ज्या बाटलीत फेव्हिकोल किंवा ग्लू असतो, त्यात का चिकटत नाही? जाणून घ्या कारण

 Favicol Or Glue Dosent Stick In Bottle: तुम्ही लहानपणी आर्ट किंवा क्राफ्ट तयार करण्यासाठी फेव्हिकोल नक्कीच वापरला असेल. आजही कागद किंवा इतर वस्तू चिकटवण्यासाठी फेव्हिकोल किंवा ग्लूचा वापर करत असालच. पण बाटलीत का चिकटत नाही? जाणून घ्या.

Updated: Jan 11, 2023, 06:40 PM IST
Knowledge: ज्या बाटलीत फेव्हिकोल किंवा ग्लू असतो, त्यात का चिकटत नाही? जाणून घ्या कारण title=

Favicol Or Glue Dosent Stick In Bottle: 'मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैयां फेव्हिकोल से' हे दबंग-2 चित्रपटातील गाणं चांगलंच गाजलं होतं. फेव्हिकोलच्या जुन्या जाहीराती आजही डोळ्यासमोरून सरसर जातात. तुम्ही लहानपणी आर्ट किंवा क्राफ्ट तयार करण्यासाठी फेव्हिकोल नक्कीच वापरला असेल. आजही कागद किंवा इतर वस्तू चिकटवण्यासाठी फेव्हिकोल किंवा ग्लूचा वापर करत असालच. बाटलीबंद पांढऱ्या रंगाचा फेव्हिकोल वस्तू झटपट चिकटवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? बाटलीबंद फेव्हिकोल आत बाटलीत घट्ट का होत नाही? किंवा बाटलीला आतून का चिकटत नाही? जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर आज याचं उत्तर जाणून घेऊयात. 

फेव्हिकोल आणि ग्लूमध्ये नेमकं काय असतं?

खरं तर ग्लू हा केमिकलपासून तयार केला जातो. याला पॉलिमर्स असं बोललं जातं. पॉलिमर्समध्ये लांब स्ट्रँड असतात त्यामुळे चिकट आणि लांब खेचला जातो. त्यानंतर पॉलिमर्समध्ये पाण्याचं मिश्रण केलं जातं. यामुळे ग्लू लिक्विड फॉर्ममध्ये येतं. तसेच ग्लूमधील पाणी सॉल्वेंटसारखं काम करत आणि ग्लू सुकू देत नाही. यामुळे ग्लू लिक्विड फॉर्ममध्ये काम करतं. जेव्हा क्राफ्ट किंवा एखादी वस्तू चिकटवण्यासाठी ग्लू बाहेर काढतो तेव्हा हवेच्या संपर्कात येतो आणि त्याचं बाष्पीभवन होतं. त्यानंतर फक्त पॉलिमर उरतं. त्यामुळे वस्तू एकमेकांना चिकटतात. 

बातमी वाचा- YouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम

बाटलीला आतून का चिकटत नाही?

ग्लू असलेली बाटलीत बंद असतो. बाटली एअरपॅक असल्याने त्यात हवा पोहोचत नाही. त्यामुळे पॉलिमर्समध्ये असलेलं पाणी तसंच राहतं. म्हणजेच त्याचं बाष्पीभवन होऊन उडून जात नाही. त्यामुळे ग्लू लिक्विट स्टेटमध्ये राहतो. पण ही बाटली कधी उघडी राहिली तर एक बाब लक्षात आली असेल की, ग्लू घट्ट होण्यास सुरुवात होते. त्यानंतर कालानंतराने सुकून जातो.