FCI Recruitment 2021 | 5 वी आणि 8 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी

फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI Recruitment 2021)ने पंजाबमध्ये आपल्या डिपो आणि ऑफिसमध्ये वॉचमॅन पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Updated: Oct 13, 2021, 03:43 PM IST
FCI Recruitment 2021 | 5 वी आणि 8 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी  title=

मुंबई : फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI Recruitment 2021)ने पंजाबमध्ये आपल्या डिपो आणि ऑफिसमध्ये वॉचमॅन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासंबधीचे अधिकृत नोटीफिकेशन काढण्यात आले आहे. 860 पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 11 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत fci-punjab-watch-ward.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

FCI recruitment 2021 अर्जाची योग्यता
जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशनमध्ये उमेदवारांना 8 वी पास असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2021 ला 18 वर्षाहून कमी तसेच 25 वर्षाहून जास्त असायला नको. आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

FCI Recruitment 2021 निवड प्रक्रिया
जारी नोटीफिकेशन नुसार प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. परीक्षेत निगेटिव मार्किंग असणार नाही. प्रश्न पत्रिकेची भाषा इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी असणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पीएसटी आणि मेडिकल परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर अंतिम निकाल जारी करण्यात येईल.
 
महत्वपूर्ण तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची तारीख  11 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटीच तारीख 10 नोव्हेंबर 2021
शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021
लेखी परीक्षेची तारीख - अद्याप निश्चित नाही.