Kuno National Park Cheetah: मध्य प्रदेशमधील श्योपुर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) सध्या चर्चेत आहे. कुनो नॅशनल पार्क चित्त्यांच्या (Kuno National Park Cheetah) मृत्यूप्रकरणी आधीच विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. त्यातच आता सातत्याने नॅशनल पार्कमधील चित्ते उद्यानाबाहेर पडत असल्याने नवी चिंता उद्भवली आहे. आता पुन्हा एकदा मादी चित्ता आशा (Female Cheetah Asha) उद्यानातून बाहेर पडली आहे. मादी चित्त्याच्या शोधासाठी बाहेर पडलेल्या पथकावर गावकऱ्यांनीच गोळीबार व मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात वन विभागाचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत.
गुरुवारी रात्री १२.३०च्या सुमारास बुराखेडा गावात ही घटना घडली आहे. बेपत्ता झालेल्या मादी चित्त्याच्या शोधासाठी गावात आलेल्या पथकाला पाहून गावकऱ्यांना ते दरोडेखोर वा डाकू असल्याचा संशय आला. त्यामुळं त्यांना तिथून घाबरवण्यासाठी त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र, तरीही पथकातील कर्मचाऱ्यांनी तिथेच उभे राहिले हे पाहून ग्रावकऱ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली व त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्याशिवाय वन विभागाच्या कारचेही नुकसान झाले आहे.
सामूहिक अत्याचारानंतर हत्या, मृतदेह बॅगेत भरुन तळेगाव स्टेशनवर फेकला, अखेर आता न्याय झाला
बेपत्ता असलेल्या मादी चित्त्याच्या गळ्यात असलेल्या जीपीएसच्या आधारे शोध घेतला जात आहे. गुरुवारी रात्री वन विभागाच्या पथकाने गावा दोन ते तीन वेळा गस्त घातली त्याचवेळी गावकऱ्यांना गावात दरोडेखोर घुसल्याचा संशय आला. वन विभागाच्या पथकाचा वेष पाहून गावकऱ्यांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळं त्यांनी पथकावर हल्ला चढवला. यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना पोहरी रुग्णालयात दाखल केले आहे.
कुनो नॅशनल पार्कमधून गेल्या काहि महिन्यांपासून चित्ते सातत्याने बाहेर पडत आहेत. चित्ते त्यांचा अधिवास सोडून बाहेर पडण्याची ही तिसरी वेळ आहे. कुनोजवळ इतर गावे असल्याने गावकऱ्यांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. अजूनतरी चित्त्यांनी मनुष्यावर हल्ला केलेला नसला तरी काही भागात चित्त्यांनी शेतकऱ्यांच्या पशुधनाची शिकार केली आहे. तसंच, शेतातही चित्ता फिरताना दिसला होता.
नवरा-नवरी अमेरिकेत, भटजीबुवा भारतात, असा पार पडला पुण्याच्या सुप्रियाचा विवाह, फी घेतली तब्बल...
कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणि दक्षिण अफ्रिकेतून आणलेल्या एकूण २० चित्त्यांपैकी तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, ज्वाला नावाच्या मादी चित्त्याने ४ बछड्यांना जन्म दिला होता. त्यापैकी तीन बछडे दगावले आहेत. तक एका बछड्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने आणि त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांचा मृत्यू झाला.