Kerala Old Women Assault : सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. एका वृद्ध महिलेसोबत एक महिला अत्याचार करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे एका लहान मुलाही वृद्ध महिलेला त्रास द्यायला सांगण्यात येत आहे. हे पाहून त्या महिलेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. एवढ्या लहान मुलाही या कुठल्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. हे पाहून नेटकरी वैतागले आहेत. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या प्रकारची ही पहिलच घटना नाही. पण अशाप्रकारच्या धक्कादायक क्रूत्य अमान्य आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपणही कधी तरी वृद्ध होणार आहोत. तेव्हा आपल्यासोबत असं आपल्या मुलासूनेने केलं तर तुम्हाला चालेल का? (First knocked off the chair then threatened with eviction womans brutal act with 80 year old grandmother Kerala Old Women Assault video viral)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वृद्ध महिला खुर्चीवर येऊन बसते. त्या रुममध्ये एक महिला दुसऱ्या खुर्चीवर फोनवर बोलत होती अन् एक चिमुकली तिथे आहे. ती महिला त्या चिमुकलीला सांगते ज्या आजीला त्रास दे. त्या वृद्ध महिला हालत नाही. त्यानंतर ती महिला स्वत: उठते आणि त्या वृद्ध महिलेवर जोरदार ओरडायला लागते. त्यानंतर ती वृद्ध महिलेला मागून जोरदार धक्का देते. त्यामुळे ती वृद्ध महिला खाली पडते.
हा धक्कादायक व्हिडीओ केरळमधील असून व्हायरल झाल्यानंतर केरळ पोलीस आणि महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. केरळमध्ये राहणाऱ्या लियामा थॉमस या 80 वर्षीय महिलेसोबत तिची 37 वर्षीय सून मंजू थॉमस हिने गैरवर्तन केलंय. आरोपी मंजू थॉमसला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मंजू थॉमसची पोलिसांकडून चौकशी सुरु असून ती तिच्या सासूचा अनेक दिवसांपासून छळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मंजू थॉमस ही एक सरकारी शिक्षिका आहे.
समाज में बुजुर्गों के साथ दुर्व्यवहार बढ़ता जा रहा है। इस तरह का व्यवहार सामाजिक बीमारी का प्रतीक है। इस महिला को गिरफ्तार किया जाना चाहिए अगर वह पहले से गिरफ्तार नहीं हुई है। वास्तव में परेशान करने वाली बात यह है कि वह किस तरह बच्चे को भी बूढ़ी महिला के साथ दुर्व्यवहार करने के… pic.twitter.com/WrucyPfMJX
— हम लोग We The People (@ajaychauhan41) December 15, 2023
गेल्या काही वर्षांपासून समाजात ज्येष्ठांसोबत गैरवर्तणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच दिसत आहे. अशा घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून या त्या महिलेला कठोर शिक्षा देण्याची मागणी होते आहे. त्रासदायक गोष्ट म्हणजे तो एका लहान मुलाला सुद्धा वृद्ध स्त्रीशी गैरवर्तन करण्यास सांगणे हे अतिशय भयानक आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील X वर एका यूजर्सने शेअर केला आहे.