Kolkata Under Water Metro News In Marathi : मेट्रोचे जाळे देशभरात सगळीकडे पसरत आहेत. त्यातच आता तुम्हाला देशातील पहिली मेट्रो जी नदीच्या पाण्याच्या खालील बोगद्यातून प्रवास करणं शक्य होणार आहे. देशात प्रथमच नदीच्या पाण्याखाली बोगद्यातून मेट्रो ट्रेन धावणार आहे. हावडा आणि एक्स्प्लनेड दरम्यान ही मेट्रो धावणार असून कोलकाता येथे नदीखाली बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या मेट्रो बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च रोजी उद्घाटन होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
कोलकाता येथे देशातील पहिली मेट्रो 24 ऑक्टोबर 1984 रोजी 3.4 किलोमीटर अंतरावर धावली होती. त्यानंतर 23 मार्च 2023 ला पाण्याखाली बोगद्यातील मेट्रोची चाचणी करण्यात आली. दरम्यान सर्व भारतीयांना ऊर अभिमानाने भरुन यावा अशी घटना भारताच्या रेल्वे इतिहासात प्रथमच घडली आहे. तसेच कोलकाता मेट्रोचे काम 1970 च्या दशकात सुरू झाले होते. पंतप्रधानांचे लक्ष पायाभूत सुविधा वाढवण्यावर आणि 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.सध्याच्या टप्प्यात शहराच्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरसाठी नदीखाली बोगदा बांधण्यात आला आहे.
हुगळी नदीच्या मधोमध असलेल्या बोगद्यातून एस्प्लानेड ते हावडा मैदानापर्यंत मेट्रोची ट्रायल रन करण्यात आल्याची माहिती यापूर्वी आली होती. नदीखालच्या मेट्रो बोगद्याचे काम जोरात सुरू होते. नदीखाली मेट्रो सुरू झाल्यामुळे, पूर्व-पश्चिम मेट्रो हावडा ग्राउंडवरून हुगळी नदीत बांधलेल्या बोगद्याद्वारे सॉल्ट लेक सेक्टर 5 पर्यंत पोहोचू शकते. त्याची एकूण लांबी अंदाजे 16.5 किमी आहे. यातील 10.8 किलोमीटर भूगर्भातून जाणार आहे. उर्वरित 5.75 किमीचा प्रकल्प जमिनीच्या वर खालचा भाग पाण्याच्या पृष्ठभागापासून 36 मीटर अंतरावर आहे आणि ट्रेन जमिनीच्या स्तरावरुन 26 मीटर खाली धावणार आहे .
1) पहिली अंडरवॉटर मेट्रो नदीपात्रापासून 13 मीटर अंतरावर आणि जमिनीपासून 33 मीटर अंतरावर धावेल.
२) मेट्रो मार्गावर एकूण चार स्थानके असतील. त्यांची नावे एक्स्प्लनेड, महाकरण, हावडा आणि हावडा मैदान आहेत. हा संपूर्ण बोगदा पूर्ण पार करण्यासाठी फक्त 45 सेकंद लागतील.
3) कोलकाताचा पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर हा 520 मीटरचा मेट्रो बोगदा आहे. त्याचा स्पॅन सॉल्ट लेक सेक्टर - 5 पासून शहराच्या IT सेक्टरला पूर्व ते पश्चिम कोलकाता आणि हावडा मैदानाभोवतीचा भाग जोडला जाईल.
4) हावडा आणि सिल्डामार्गे भागाला जाण्यासाठी एक तास लागतो. कोलकाता मेट्रोपासून 40 मिनिटांचा फरक असेल.
5) ब्रेबॉर्न रोड कॉम्प्लेक्स अतिशय हिरवेगार असून त्यात जुन्या इमारती आणि घरे आहेत. बांधकाम सुरू असताना त्यांना तात्पुरता निवारा देण्यात आला होता. हावडा मैदान ते एक्स्प्लनेड या अंतरासाठी बोगदा खणणे खूपच किचकट काम होते.
6) हे बोगदे 120 वर्षांपर्यंत सेवा देण्यासाठी बनवण्यात आले आहेत. पाण्याचा एक थेंबही बोगद्यात जाऊ शकत नाही.
7) बोगद्यातील खालचा भाग पाण्याच्या पृष्ठभागापासून 36 मीटर अंतरावर आहे आणि ट्रेन जमिनीच्या स्तरावरुन 26 मीटर खाली धावणार आहे.