शहीद मोहम्मद इक्बाल यांच्यावर अंत्यविधी

जम्मूतल्या सूंजावान हल्लात शहीद झालेल्या सात जवानांची पार्थिव शरीरांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यविधी करण्यात आले.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 14, 2018, 09:00 AM IST
शहीद मोहम्मद इक्बाल यांच्यावर अंत्यविधी title=

श्रीनगर : जम्मूतल्या सूंजावान हल्लात शहीद झालेल्या सात जवानांची पार्थिव शरीरांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यविधी करण्यात आले.

वातावरण बदलतंय

शहीदामध्ये काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल या छोट्याशा गावात लान्स नायक मोहम्मद इक्बाल यांचाही समावेश होता. इक्बाल यांना अंतिम निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येनं तरूण उपस्थित होते. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. 

पाकिस्तानविरोधी घोषणा

काश्मीर खोऱ्यात विशेषतः पुलवामा, शोपियान यासारख्या जिल्ह्यांमध्ये फुटीरतावादी विचारसरणीमुळे अनेक तरुणांची माथी भडकवण्यात येतात. अशा परिसारात रहाणाऱ्या लान्स नायक मोहम्मद इक्बाल यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केलं. शिवाय ते काश्मीरचेच सुपूत्र असल्यानं पाकिस्तानी कारवायांमुळे काश्मीरी तरुणांचाच हकनाक बळी जात असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय. म्हणूनच इक्बाल यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानविरोधी घोषणांना महत्व आहे.