Gangajal Test Video: गंगा भारतातील सर्वात लांब नदी आहे. उत्तराखंडच्या गोमुखमधून उगम पावणारी नदी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून वाहत बंगालच्या खाडीला जाऊन मिळते. गंगा नदी 2,525 किमीपर्यंतचे अंतर कापते. हिंदू धर्मात गंगा नदीचे महत्त्व अधिक आहे. गंगा नदीला देवीचा दर्जा देण्यात आला आहे. पौराणिक ग्रंथ रामायण आणि महाभारतात गंगा नदीचा उल्लेख सापडतो. गंगा नदी पापमुक्त करते आणि मोक्ष देणारी असंही म्हटलं जातं. गंगाजलला पौराणात अधिक महत्त्व आहे. गंगाजल कित्येक वर्ष जरी ठेवलं तरी ते कधीच खराब होत नाही ना त्या पाण्याला दुर्गंधी येते. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत गंगानदीच्या पाण्याचे परिक्षण करण्यात आले, त्याचा रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
कंटेट क्रिएटर आशु घईने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत आशू म्हणतोय की, गंगाजलचे परीक्षण करण्यासाठी हरिद्वारयेथून गंगाजल घेऊन आलो आणि त्याची तपासणी करण्यात आली. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या डब्यात आशु गंगाजल भरताना दिसताना आहे. त्यानंतर तो त्याच्याकडे असलेल्या मायक्रोस्कोपमध्ये चाचणी करतो.
गंगाजलचे परिक्षण करण्यासाठी तो गंगाजलचे काही थेंब मायक्रोस्कोपमध्ये टाकतो. मात्र त्याला पाणी एकदाम साफ दिसते. पाण्यात कोणत्याही प्रकारणे जिवाणू दिसत नाही. मात्र, एवढ्यावरच न थांबता त्याने प्रयोगशाळेत या पाण्याचे परिक्षण केले. प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, 40 एक्स मायक्रोस्कॉपने परिक्षण करुनही गंगाजलमध्ये कोणत्याही प्रकारचे जिवाणू आढळून आले नाही. त्यानंतर चार दिवस हे पाणी तसंच ठेवून पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली.
गंगाजलची पुन्हा एकदा तपासणी केल्यानंतर व्हिडिओत कंटेट क्रिएटर आशुने त्या टेस्टचे पेपरदेखील दाखवले आहेत. त्यात म्हटलं आहे की, नो कॉलीफॉर्म आइसोलेटेड, नो माइक्रोऑर्गनिज्म आइसोलेटेड. त्यानंतर आशुने व्हिडिओत म्हटलं आहे की, गंगाजल पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत आहेत. हिंदू धर्मात म्हणूनच गंगा नदीला आईचा दर्जा दिला आहे, असं म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डने म्हटलं होतं की, गंगा नदीचे काही क्षेत्रातील पाणी पिण्यायोग नाहीये. तर, IIT कानपूरच्या एका अभ्यासातून समोर आलं आहे की, गंगोत्री, ऋषिकेश दरम्यान अद्यापही गंगेचे पाणी स्वच्छ आणि पिण्यालायक आहे.