दारूच्या नशेत तरुणींचा 'हाय व्होल्टेज ड्रामा', सेक्यूरिटी गार्डसोबत नको ते घडलं!

दारूच्या नशेत तरुणींनी सर्व मर्यादा ओलांडल्या...

Updated: Oct 8, 2022, 07:42 PM IST
दारूच्या नशेत तरुणींचा 'हाय व्होल्टेज ड्रामा', सेक्यूरिटी गार्डसोबत नको ते घडलं! title=

Drunken young Girls Video : सोशल मीडियामुळे अनेक नवनवीन प्रकार समोर येत असतात. समाजातील अनेक जाचक गोष्टींना सोशल मीडियामुळे (Social Media Advantage) वाचा फुटल्याचं दिसून येतं. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये मद्यधुंद तरुणींची मुजोरी दिसून आली आहे. (girls created a ruckus late at night got drunk-and misbehaved with the security guards noida crime news)

नोएडातील हायप्रोफाईल सोसायटीमधून धक्कादायक व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत, ज्यामध्ये महिलांसोबत होणारे गैरवर्तन स्पष्टपणे दिसतंय. शुक्रवारी रात्री देखील असाच काहीसा प्रकार समोर आलाय. नोएडातील एका हायप्रोफाईल सोसायटीत (Drunken young Girls Video) दोन मुलींनी दारू पिऊन, गार्डसोबत शिवीगाळ आणि गैरवर्तन करून गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत मुलींचा हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता.

आणखी वाचा - सावध व्हा! मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय 'रावण', मुंबई पोलिसांनी जारी केला Video

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेक्यूरिटी गार्डने सोसायटीचे स्टिकर नसलेली कार गेटवर थांबवली (Noida girls created a ruckus late at night). गाडी थांबवल्याने उपस्थित असलेल्या मुलींनी गोंधळ सुरू केला. तरुणी दारूच्या नशेत होत्या आणि ती तिथे उभ्या असलेल्या सेक्यूरिटी गार्डला सतत शिवीगाळ करत होती, तसेच एका गार्डची कॉलर धरून मारहाणही केली (Drunken Girls Misbehaved with the security guards).

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान , या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी सेक्यूरिटी गार्डची वैद्यकीय तपासणी केली आणि तरुणींना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर गाडीची आवश्यक कागदपत्र नसल्याने त्यांचं चालन देखील कापण्यात आलं आहे.