मुंबई : गोवा, उत्तराखंड राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होणार आहे. गोव्यात प्रमोद सावंत, उत्तराखंडमध्ये पुष्करसिंह धामी 2 मुख्यमंत्र्यांचं भवितव्य ठरणार आहे. उत्तर प्रदेशातही 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. (Goa Uttarakhand Elections 2022 Live Updates, UP Election Live Update)
गोवा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. ४० जांगासाठी ३०१ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. सत्ताधारी भाजप सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस भाजपकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी जोर लावत आहेत.
Goa Governor PS Sreedharan Pillai and his wife Reetha Sreedharan cast their votes at polling booth number 15 of Taleigao Assembly Constituency#GoaElections2022 pic.twitter.com/IGhPWBS04O
— ANI (@ANI) February 14, 2022
उत्तराखंड विधानसभेसाठीही आज मतदान होतंय. राज्यात विधानसभेच्या ७० जागांसाठी ६३२ उमेदवार रिंगणात आहेत. तर उत्तर प्रदेशात दुस-या टप्प्याचं मतदान आज पार पडणार आहे.
९ जिल्ह्यातील ५५ विधानसभा मतदारसंघात हे मतदान होणार आहे.
यूपी, उत्तराखंड आणि गोव्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. अनेक नेत्यांनी मतदान करावे, असे आवाहन केले आहे.
Preparations underway ahead of voting for the #UttarakhandElections2022; Visuals from Khalsa National Balika Inter College, Haldwani
Voting for the Uttarakhand Assembly elections will start at 8 am. pic.twitter.com/qkCMqgwNX0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 14, 2022
आज यूपीच्या 9 जिल्ह्यांतील 55 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये नकुड, चंदौसी, तांडा, स्वार आणि शाहजहानपूर या विधानसभेच्या जागांचा समावेश आहे.
अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे, उत्तराखंड आणि गोव्यातील विधानसभेच्या सर्व जागांसाठी आज मतदान होणार आहे.
यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५८ विधानसभा जागांसाठी १० फेब्रुवारीला मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 60.17 टक्के मतदान झाले.
आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानात 55 विधानसभा जागांवर 586 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
शहाजहांपूरमधून सुरेश खन्ना, रामपूरमधून आझम खान, स्वारमधून अब्दुल्ला आझम खान, नकुडमधून धरम सिंग सैनी, चंदौसीमधून गुलाब देवी, आमलामधून धरमपाल सिंग आणि अमरोहातून मेहबूब अली यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.