Gold Rate Today: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. आज सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज सोन्याचे दर वधारले आहेत. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. जाणून घेऊया सोन्याच्या दरात आज किती वाढ झाली आहे.
दिवाळीत सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. त्यामुळं दिवाळीच्या या पाच दिवसांत ग्राहक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या आधी सोन्याच्या दरात थोडी घट झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वधारले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 650 रुपयांनी वधारले आहे. त्यामुळं 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 80,450 रुपयांवर पोहोचले आहे.
दिवाळीनंतर लग्नसराईचा दिवस सुरू होतात. यासाठी दिवाळीतच सोनं खरेदी करण्यास सुरुवात होते. मात्र, दिवाळीत आता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुडरिटर्ननुसार, 22 कॅरेट सोन्याच्या दरात आज 600 रुपयांची घट झाली आहे त्यामुळं सोनं 73,750 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं 60,340 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 73,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 80,450 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 60,340 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,375 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8, 045 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6, 034 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 59,000 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 64,360 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 48,272 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 73,750 रुपये
24 कॅरेट- 80,450 रुपये
18 कॅरेट- 60,340 रुपये