India's Got Latent: ‘आम्हाला एक पैसाही...', अपूर्वी मखीजा आणि आशीष चंचलानीचे मुंबई पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे

India's Got Lalent: मुंबई पोलिसांनी इंडियाज गॉट लॅलेंट वादाचा तपास कसून तपास सुरु केलाय. दरम्यान, शोमध्ये जज असलेले आशिष चंचलानी आणि अपूर्वा माखीजा यांनी चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत.   

नेहा चौधरी | Updated: Feb 12, 2025, 08:46 PM IST
India's Got Latent: ‘आम्हाला एक पैसाही...', अपूर्वी मखीजा आणि आशीष चंचलानीचे मुंबई पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे title=

India's Got Lalent: समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये रणवीर अलाहाबादियाने अश्लिल आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे हा शो वादात अडकला आहे. या डार्क कॉमेडी शोबद्दल सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. याबद्दल राज्य सरकारने दखल घेतली असून या शोशी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शोशी संबंधित 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

या प्रकरणात खार पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी शोचे जज आशिष चंचलानी आणि अपूर्वा माखीजा तसेच शोशी संबंधित तीन तांत्रिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यासोबतच, पोलिसांनी ज्या स्टुडिओमध्ये हा शो चित्रित झाला होता त्या स्टुडिओचे मालक बलराज घई यांचेही जबाब नोंदवलंय. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी अद्याप घेतलेला नाही. पोलिसांनी सांगितलंय की ते शोशी संबंधित लोकांचे जबाब नोंदवतील आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस चौकशीदरम्यान आशिष चंचलानी आणि अपूर्वा मखीजा यांनी अनेक खुलासे केलंय. 

‘India's Got Latent शो स्क्रिप्टेड नाही’

अपूर्वा मखीजा आणि आशिष चंचलानी यांनी खार पोलिसांना दिलेल्या त्यांच्या जबाबात म्हटलंय की, इंडियाज गॉट लॅलेंट हा शो स्क्रिप्टेड नाही. या शोमध्ये, परीक्षक आणि सहभागींना मोकळेपणाने बोलण्यास सांगितलं जातं. इंडियाज गॉट टॅलेंटमधील जजला कोणतेही पैसे दिले जात नाहीत. शिवाय परीक्षकांना शोमधील मजकूर त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या शोमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी तिकिटं खरेदी करावी लागतात. तिकीट विक्रीतून जे काही पैसे येतात ते शोच्या विजेत्याला देण्यात येतो. 

संपूर्ण प्रकरण काय आहे आणि शोबाबत वाद का आहे?

खरंतर, कंटेंट क्रिएटर आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहाबादिया अलीकडेच 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये पाहुणे जज म्हणून सहभाग झाला होता. यादरम्यान, त्याने एक वादग्रस्त विधान केलं आणि एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या लैंगिक जीवनाबद्दल प्रश्न विचारला. यानंतर, रणवीरच्या कमेंटची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. लोक या अश्लील प्रश्नावर नेटकरी खूप संतापले. लोकांनी रणवीरला जोरदार फटकारले आणि शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली. यानंतर, रणवीर इलाहाबादिया आणि शोच्या इतर जज आणि निर्मात्यांवर मुंबईशिवाय अनेक ठिकाणी खटले दाखल झाले आहेत.