'या' ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचे 628800000 रुपयांचे नुकसान; ट्रेनचे नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल

या एका ट्रेनमुळे भरातीय रेल्वेचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. मोठा गाजावाज करत ही ट्रेन सुरु करण्यात आली होती. 

वनिता कांबळे | Updated: Feb 12, 2025, 08:36 PM IST
'या' ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचे 628800000 रुपयांचे नुकसान; ट्रेनचे नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल title=

Indian Railways Profitable Train: भारतीय रेल्वे हा सरकारची तिजोरी भरणारे महत्वाचे माध्यम आहे. भारतीय रेल्वेचे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. काश्मिर पासून  भारतीय रेल्वेते जाळं पसरलेले आहे.  भराताच्या कानाकोपऱ्यात दररोज जवळपास 12817 ट्रेन धावतात. दिवाळी, होळी, छठ पूजा, नव वर्ष तसेच महाकुंभ यासारख्या कार्यक्रमांनिमित्त रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवल्या जातात. दररोज सुमारे अडीच कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विविध मार्गावर धावणाऱ्या अनेक ट्रेन रेल्वेला कोट्यावधीचा महसुल मिळवून देता. मात्र, दुसरीकडे अशा काही ट्रेन आहेत ज्यामुळे  रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे.अशाच एका ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचे 628800000 रुपयांचे नुकसान झाले आहे. जाणून घेऊया ही रेल्वे कोणती?

रेल्वेने सर्वाधिक कमाई करणाऱ्या ट्रेनची यादी जाहीर केली आहे.  बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसने सर्वाधिक कमाईचा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2022-23  या आर्थिक वर्षात बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसने रेल्वेला 176 कोटींचा महसूल मिळवून दिला.  सुलभ आणि जलद प्रवासासाठी अनेक प्रवासी राजधानी एक्सप्रेसने प्रवास करतात. यामुळेच बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन ठरली आहे. 

दिल्ली-लखनऊ  तेजस एक्सप्रेस आणि अहमदाबाद-मुंबई  तेजस एक्सप्रेस या दोन ट्रेनमुळे देखील रेल्वेचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन वर्षांत या ट्रेनमुळे 62.88 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 2019 भारतीय रेल्वेने या ट्रेन चालवण्याची जबाबदारी आयआरसीटीसीकडे सोपवली होती. परंतु प्रवाशांचा या ट्रेनला प्रतिसाद मिळाला नाही. 

प्रवाशांची संख्या कमी असल्याने दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसचे 27.52  कोटी रुपयांचे नुकसान झाले. या एक्सप्रेस ट्रेनमध्ये दररोज 200 ते 250 सिट रिकाम्या असतात. याचा थेट परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावर होत आहे. 
तेजस एक्सप्रेसच्या आधी, राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस या मार्गावर धावत आहेत.   राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसचे प्रवासी भाडे तेजसपेक्षा कमी आहे. या ट्रेमध्ये सुविधाही चांगल्या मिळतात. यामुळेच मोठ्या संख्येने प्रवासी तेजस पेक्षा राजधानी किंवा शताब्दी ट्रेनचे तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करतात. या दोन ट्रेनचे तिकीट मिळाले नाही तर नाईलाजास्तव प्रवासी तेजस एक्सप्रेसचे तिकिट बुक करतात.

प्रवाशांची प्रतिसाद कमी असल्यामुळे अनेकदा या ट्रेनच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. पूर्वी ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावत होती, पण आता ती फक्त चार दिवस धावते. कोविड महामारीच्या काळात म्हणजेच 2019 ते 2022  दरम्यान, तेजस एक्सप्रेस पाच वेळा तात्पुरती बंद करण्यात आली होती.  2019-22  मध्ये या ट्रेनने फक्त 2.33 कोटींचा नफा कमावला होता, परंतु त्यानंतर 2020-21 मध्ये 16.19 कोटी तर 2021 - 22  मध्ये या ट्रेनचे 8.50 कोटी रुपयांचे नुकसान झाले.