Samudrika Shastra: वैदिक ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्रानुसार समुद्रिक शास्त्र आहे. सामुद्रिक हा संस्कृत शब्द असल्यास मराठीत याला शरीराच्या वैशिष्ट्यांचे ज्ञान असं म्हणतात. यात शरीराच्या विविध अंगाचा अभ्यास करण्यात येतो. समुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीरावरील तीळ हे वैशिष्ट्य जागी असल्यास त्यांचा त्याचा आयुष्यावर शुभ की अशुभ काय परिणाम होतो. आज आपण शरीराच्या कुठल्या भागावर तीळ असल्यास तो शुभ ठरतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मानवी शरीरावर कुठल्याही भागावर तीळ असू शकतात. ज्योतिषशास्त्रातही तीळ हे नशिबाचे सूचक मानलं जातात आणि शरीराच्या काही भागांवर तीळ असणे देखील श्रीमंतचे लक्षण आहे. शरीराच्या कुठल्या भागावर तीळ असणे शुभ आहे पाहूयात.
समुद्री शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या गालावर तीळ असतो, अशा व्यक्ती भाग्यवान असतात. तसंच, अशा व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असते. त्याच वेळी, ते त्यांच्या जोडीदाराशी खूप निष्ठावान असतात. तसंच, त्यांचा त्याच्या जोडीदाराशी चांगला समन्वय असतो. तसंच अशी व्यक्ती रोमँटिक असते. त्याच वेळी, असे लोक त्यांच्या जोडीदाराची काळजी घेण्यात माहीर असतात.
ज्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी तीळ असतो त्याला सर्व भौतिक सुख मिळतं. शिवाय, अशा लोकांना समाजात खूप आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. तिथेच हे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतात. या लोकांमध्ये त्यांच्या योजना चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची क्षमता दिसून येते.
जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर तीळ असेल तर ही लोक खवय्ये असतात. जर नाभीभोवती तीळ असेल तर व्यक्तीला धन आणि समृद्धी प्राप्त होते. तसंच, अशी व्यक्ती पैसे जमा करण्यात तज्ज्ञ असतात. हे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)