खतरनाक लूकसह विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' चित्रपटाचा टीझर रिलीज, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

विजय देवरकोंडाच्या आगामी 'किंगडम' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. या टीझरमध्ये विजय एका जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये रणबीर कपूरने आपला आवाज दिला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 12, 2025, 07:28 PM IST
खतरनाक लूकसह विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' चित्रपटाचा टीझर रिलीज, 'या' दिवशी होणार प्रदर्शित title=

Vijay Deverakonda Movie : अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याच्या बहुप्रतिक्षित 'किंगडम' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल आहे. टीझरमध्ये विजय देवरकोंडाचा शक्तिशाली अवतार बघायला मिळत आहे. यासोबतच चित्रपटाचे शीर्षकही जाहीर करण्यात आले आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टीझरच्या सुरुवातीला, चित्रपटाची कथा एका आवाजाद्वारे सांगितली जात आहे. ज्यामध्ये युद्धाबद्दल बोलले जात आहे. यामध्ये अभिनेता अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचा टीझर 1 मिनिट 55 सेकंदांचा आहे. या चित्रपटाची कथा लोकांचे रक्षण आणि बचाव करण्यासाठीच्या युद्धाभोवती फिरत आहे. टीझरमध्ये विजय देवरकोंडाचा लूक देखील खूपच खतरनाक दिसत आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटासंदर्भातील एक फोटो देखील शेअर केला आहे. 

'किंगडम' चित्रपटाचा अप्रतिम टीझर

विजय देवरकोंडाच्या 'किंगडम'या चित्रपटाचा टीझर तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये एक भयंकर युद्ध दाखवले आहे जे कधीही थांबणार नाही. राजवाड्यांमध्ये रक्त वाहत आहे. पृथ्वीवर हल्ले होत राहतील, मृतदेह मातीत मिसळत राहतील, हा विनाश कोणासाठी, हा बंड कोणासाठी, हे महायुद्ध कोणासाठी? यानंतर विजयचा प्रवेश होतो. ज्यामध्ये तो पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहे. तर काही काळानंतर तो तुरुंगात कैद झालेला दिसत आहे. 

चित्रपट कधी प्रदर्शित होणार

या चित्रपटाचा टीझर सितारा एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. हा चित्रपट 30 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर आता चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या टीझरमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने हिंदी टीझरसाठी त्याचा खास आवाज दिला आहे.