नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. भारतीय बाजारात गेल्या पाच दिवसांतील सोन्याचे दर पाहता, या आठवड्यात सोन्याने भाव वधारले असल्याचं चित्र आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची भाव 51,620 इतका आहे.
या आठवड्याच्या सुरुवातील सोमवारी 14 सप्टेंबरला सोन्याचा भाव 51,349 प्रति 10 ग्रॅम इतका होता. मंगळवारी तो भाव वाढून 51,893 इतका झाला. बुधवार आणि गुरुवारी दरांत काहीशी घसरण झाली आणि अनुक्रमे सोन्याचा दर 51,797 आणि 51,511 प्रति 10 ग्रॅम होता.
दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचा दर 65,905 प्रति किलोग्रॅम इतका आहे.
शहर | 22 कॅरेट | 24 कॅरेट |
चेन्नई | 49,380 | 53,860 |
मुंबई | 50,340 | 51,340 |
नवी दिल्ली | 50,160 | 54,720 |
पुणे | 50,340 | 51,340 |
अहमदाबाद | 50,340 | 53,740 |
नाशिक | 50,340 | 51,340 |
पटना | 50,340 | 51,340 |
चंडीगढ | 49,810 | 52,510 |
जयपूर | 50,160 | 54,720 |
लखनऊ | 50,160 | 54,720 |
कोरोना काळात जगभरातील अनेक व्यवहार ठप्प झाल्याचं चित्र असताना दुसरीकडे सोन्याची झळाळी मात्र कायम आहे. कोरोना संकटातही सोन्याचे दर सतत वाढले आहेत. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजार, शेअर मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे आहे. अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत असल्याचे सोन्याची किंमती वधारल्या आहेत.