मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच सोने-चांदीचे दर स्थिर पाहायला मिळाले. बँक बाझार डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमकरता 46,130 रुपये आहे. तर चांदीचा दर हा 63500 रुपये प्रति किलो आहे.
20 सप्टेंबर रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 45,817 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम 44,580 रुपयांना विकले जात होते. आज 24 कॅरेटची किंमत 46,700 रुपये आणि 22 कॅरेटची किंमत 44,480 रुपये आहे. चांदीच्या किंमतीत 300 रुपयांची वाढ दिसून आली आहे. 20 सप्टेंबर रोजी 64,200 रुपये प्रति किलोने विकली जाणारी चांदी आज 64,500 रुपये प्रति किलोने विकली जाईल. हा दर भोपाळमध्ये आहे.
22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचे दर दिल्लीत 45,450 रुपये तर मुंबईत 45,130 रुपये इतका आहे. चेन्नईत पिवळ्या मेटलचा दर हा 43,600 रुपये इतका नोंदवला आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा दर 49,580 रुपये इतका आहे. तर मुंबईत 46,130 रुपये इतका 10 ग्रॅम सोन्याचा दर आहे. तर चेन्नईत आज सकाळी सोन्याचा दर 47,560 रुपये असून कोलकातामध्ये सोन्याचा दर हा 48,250 रुपये इतका आहे.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त सारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी ते दागिने बनवता येत नाही. म्हणूनच बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.