दागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भाव

Gold Price Today, 9th October:  सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. कसे आहेत आजचे दर पाहूयात 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 9, 2024, 12:00 PM IST
दागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भाव  title=
gold price today on 9th october 2024 gold slips from record check 220 24kt gold price in india

Gold Price Today, 9th October: तुम्हाला देखील नवरात्रीत सोनं खरेदी करण्याची इच्छा आहे का. तर आज तुम्हाला ही संधी मिळू शकते. आज नवरात्रीच्या सातव्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं उच्चांक गाठत असला तरी वायदे बाजार व सराफा बाजारात मात्र सोन्याची घसरण झाली आहे. बुधवारी मौल्यवान धातुचे भाव घसरले आहेत. तर, सराफा बाजारात सोनं किंचित स्वस्त झालं आहे. मात्र, दिवाळीनंतर सोनं पुन्हा एकदा वाढू शकते. त्यामुळं सोनं खरेदीची हिच योग्य संधी आहे. 

सोन्याच्या दरात आज 760 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 76,690 रुपये प्रतितोळावर स्थिरावले आहेत. ईराण आणि इस्त्राइलदरम्यान पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळं सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर कमी झाल्याने आज भारतात चांदी 94,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुमध्ये नरमाई दिसत असल्याने  स्थानिक विक्रेत्यांमध्ये मागणी वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70,300 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  76,690 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  57,520 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,030 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 669  रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 752 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,240 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,352 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    57,520 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 70,300 रुपये
24 कॅरेट- 76,690 रुपये
18 कॅरेट- 57,520 रुपये