मुंबई : Gold Price Today 1st July 2022 : सरकारने आजपासून सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली आहे. या बातमीनंतर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. आज सोन्याच्या किमतीत सुमारे 3 टक्क्यांनी प्रचंड वाढ झाली आहे. आज सकाळीच सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची उसळी दिसून आली. आज वायदा बाजारात सोने 52 हजारांच्या आसपास ट्रेड करीत होते.
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 1,103 रुपयांनी वाढून 51,620 रुपये झाली. तर MCX वर चांदीची फ्युचर्स किंमत 370 रुपयांनी वाढून 58,700 रुपये प्रति किलो झाली.
सोने दोन महिन्यांच्या उच्च पातळीवर आहे. याआधी सोन्याचा व्यवहार 51,000 च्या पातळीवर सुरू झाला होता, तर चांदीचा व्यवहार 58,418 रुपयांवर सुरू झाला.
सोने 24 कॅरेट 52,200 रुपये प्रति तोळे
चांदी : 59,000 रुपये प्रति किलो
तज्ज्ञांच्या मते, सरकारच्या या निर्णयानंतर सोन्याच्या दरातही आणखी वाढ होणार आहे. एकूणच लवकरच सोने नवीन उच्चांक गाठू शकते.