Gold rate Today | सरकारच्या या निर्णयानंतर सोन्याच्या दरात आज सलग सातव्या दिवशी मोठी घसरण; खरेदीसाठी सर्वोत्तम संधी

Gold-Silver Price Today : सरकारने सोन्यावर आयात शुल्क लागू केल्यानंतर त्यात घट होताना दिसत आहे. शुक्रवारी चांदीच्या दरातही प्रतिकिलो 1125 रुपयांची मोठी घसरण झाली.

Updated: Jul 15, 2022, 03:26 PM IST
Gold rate Today | सरकारच्या या निर्णयानंतर सोन्याच्या दरात आज सलग सातव्या दिवशी मोठी घसरण; खरेदीसाठी सर्वोत्तम संधी title=

मुंबई : Gold Price Today 15th July 2022: महिन्याच्या सुरुवातीला १ जुलैला आयात शुल्क वाढवण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. 30 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सलग तीन दिवस सोन्याच्या दरात तेजी नोंदवली गेली. परंतू त्यानंतर 4 थ्या दिवसापासून सुरू झालेली घसरण आजही म्हणजेच सलग 7 व्या दिवशी सुरूच आहे.

15 जुलै (शुक्रवार) हा या आठवड्याचा सलग चौथा व्यवहार दिवस आहे. जेव्हा सोन्यात घसरण नोंदवली गेली. 24 कॅरेट सोन्याचे दर 50 हजारांच्या जवळ आले. अशा स्थितीत सोने खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 179 रुपयांनी घसरून 50386 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 

शुक्रवारी दुपारी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जारी केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 50386 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. त्याचवेळी एक किलो चांदीच्या दरात मोठी घसरण होऊन 54560 रुपयांवर आली.

MCX वर सोने आणि चांदीचे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, शुक्रवारी सोने आणि चांदी दोन्ही लाल निशाणासह व्यवहार करताना दिसले. दुपारी दोनच्या सुमारास सोने 0.32 टक्क्यांनी घसरून 50,067 रुपयांवर आले. त्याचवेळी चांदीचा भावही 54,629 रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरला.