मुंबई : प्रत्येक कर्मचारी किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातून पीएफ कापला जातो, ज्यावर तुम्हाला पेन्शनची देखील योजना दिली जाते, हे खरेतर कर्मचाऱ्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु त्यावर सध्या मिळणारा लाभ किंवा रक्कम ही फारच तुटपुंजी आहे. ज्यामुळे सध्या नोकरदारांकडून ‘पेन्शन स्कीम-1995’ (Pension Scheme-1995) अंतर्गत किमान निवृत्तीवेतन (Minimum Pension) वाढवण्याची मागणी केली जात होती. यावर EPFO आता एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा मिळेल.
EPFO अशी योजना आखत आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांकडे निवृत्तीवेतनाची म्हणजेच पेन्शनची निश्चित रक्कम निवडण्याचा पर्याय मिळेल. यामध्ये कर्मचाऱ्यांसोबतच स्वयं-रोजगारित व्यक्ती देखील नोंदणी करू शकतात. निवृत्ती वेतनासाठीची रक्कम वेतन आणि उर्वरित नोकरीच्या कालावधीच्या आधारावर ठरवली जाते.
आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.
1250 रुपये प्रति महिना मर्यादा
EPS रक्कम करमुक्त आहे. सध्याची निवृत्ती वेतनाची किमान रक्कम जर तुम्ही पाहिली तर ती अत्यंत तुटपुंजी आहे. सध्याच्या नियमानुसार 1250 रुपयांपर्यंत तुम्हाला सर्वाधीक योगदानाची मर्यादा दिले जाते. परंतु ही सुविधा आता बदलून नोकरदारांना चांगला पर्याय देण्याच्या तयारीत आहे.
EPS सध्याचा नियम काय?
EPSच्या सध्याच्या नियमानुसार कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 12% योगदान PF मध्ये वर्ग केले जाते. कर्मचाऱ्याच्या त्या 12% योगदानातून 8.33% हिस्सा EPS मध्ये वर्ग केला जातो. सध्या निवृत्तीवेतन योग्य वेतनाची अधिकतम मर्यादा 15 हजार रुपये आहे. त्यात निवृत्ती वेतन फंडात प्रत्येक महिन्याला अधिकतम 1250 रुपये जमा केले जाऊ शकतात.
आता हे पैसे तुम्हाला कसे मिळतात ते जाणून घ्या.
निवृत्तीवेतनाचं सूत्र
EPS सूत्र = मासिक निवृत्तीवेतन = (निवृत्ती वेतन योग्य वेतन x उर्वरित सेवा कालावधी /70).
लिमीट हटवली गेली तर किती पेन्शन मिळणार?
जर कुणाचे मासिक वेतन (मागील 5 वर्षांच्या वेतनाची सरासरी) 15 हजार रुपये आणि नोकरीचा कालावधी 30 वर्ष असल्यास प्रति महिना (15,000 X 30)/70 = 6428 रुपयांचे निवृत्तीवेतन त्या व्यक्तीला मिळत आहे.
जर 15 हजारांची मर्यादा वाढून 30 हजार झाल्यास तुम्हाला मिळणारे निवृत्तीवेतन (30,000 X 30)/70 = 12 हजार 857 रुपये प्रति महिना
वरील रक्कम पाहाता कर्मचाऱ्यांना मर्यादा वाढवल्याने फायदाच होणार आहे, त्यामुळे EPFO लवकरच ही मर्यादा वाढवेल याच आशेवरती कर्मचारी बसले आहेत.