नवी दिल्ली : दिग्गज तंत्रज्ञान कंपनी Google भारती एअरटेलमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये इक्विटी सोबतच संभाव्य व्यावसायिक करारांसाठी निधीचा समावेश आहे. ज्या अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी परस्पर सहमतीच्या अटी शर्थीना मंजूरी दिली जाईल.
Google ही गुंतवणूक 'गुगल फॉर इंडिया' डिजिटायझेशन फंडाचा एक भाग म्हणून करणार आहे. "या अंतर्गत भारती एअरटेलमध्ये $700 दशलक्षची इक्विटी गुंतवणूक 734 रुपये प्रति शेअर या दराने केली जाईल," एअरटेलने एका निवेदनात म्हटले आहे.
एअरटेलच्या शेअर्समध्ये उसळी
ही बातमी बाजारात पसरताच भारती एअरटेलच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली आणि तो 2 टक्क्यांहून अधिक वाढला.