Gudi Padwa 2023 How to Make Shrikhand Chakka at Home: गुढीपाडव्याचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांच्या घरी जोरात गुढीपाडव्याची (Gudi Padwa 2023 Recipe) तयारी सुरू झाली असेलच. तुम्हीही उद्या पाडव्याला कोणते चमचमीत पदार्थ (Shrikhand Recipe at Home) करायचेत याची यादी करून तयार ठेवली असलेच. या यादीमध्ये पुरणपोळ्या आणि श्रीखंड (How to Make Shrikhand at Home) हमखास असेल. बाहेरून श्रीखंड अथवा पुरणपोळ्या आणण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तो बाजूला ठेवा.
उद्या गुढीपाडव्याला (Gudi Padwa Shrikhand) मस्त घरच्या घरीच श्रीखंड बनवा. हो त्यासाठी मग तुम्ही बाहेरून चक्का आणायचा विचार करत असाल (How to Make Chakka at Home) तर तोही सोडून द्या कारण सोप्प्या घरगुती टीप्स (Recipe Tips) वापरून तुम्ही योग्य पद्धतीनं चक्का घरच्या घरी बनवू शकता. त्यासाठी तुम्हा काही गोष्टी आणाव्यात लागतील आणि कराव्या लागतील तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की घरीच चक्का कसा बनवाल? (Gudi Padwa 2023 how to make chakka for shrikhand at home try these easy steps and make sweet and yummy shrikhand at home in a traditional way)
सणासुदीला घरच्या घरीच पदार्थ बनविणे आणि ते आपल्या नातेवाईकांसोबत एकत्र बसून खाणे याची काही मज्जाच वेगळी असते. परंतु ऑफिस आणि कामामुळे आपल्याला घरीच श्रीखंड बनविणे खूप कठीण जाते. परंतु काळजी करू नका तुम्ही सहजसोप्प्या पद्धतीनं घरच्या घरी चक्का करू शकता. आपल्या घरी श्रीखंड आणि आम्रखंड (How to Make Shrikhand Fast and Easy) हे हमखास केले जाते तेव्हा आपल्यालाही श्रीखंड बाहेरून आणण्यापेक्षा घरीच श्रीखंड करावेसे वाटते, मग विचार कसाल करताय. घरच्या घरीच चक्का बनविण्यासाठी थोडासा वेळ काढा असा तयार करा चक्का आणि श्रीखंड.
श्रीखंड हे (Food For Gudi Padwa and Recipe) दुधापासून तयार होते तेव्हा यासाठी तुम्हाला दुधाचा (Milk Recipe) योग्य तो वापर करावा लागेल. तुम्हाला अर्धा किलोचे श्रीखंड तयार करायचे असेल तर त्यासाठी 1 लीटर दूध विक घ्यावे लागेल. पहिल्यांदा दुधाच्या सायीसोबत दही तयार करा.
मग ते 1 लीटर दुधाचे सायीसकट असलेले दही हे सुती कपड्यात वरच्या बाजूला टांगून ठेवा. त्यानंतर या दह्यातील पाणी सुती कपड्यातून बाहेर येयला लागेल आणि आतमध्ये एक घट्ट गोळा तयार होईल. त्यामध्ये या गोळ्याच्या वजनानुसार त्यात साखर मिसळा आणि हे मिश्रण अधिक घट्ट तयार करा. याला तुम्ही जितकं घट्ट कराल तसा तो चक्का अधिक स्वादिष्ट दही तयार करण्यासाठी मदत करेल. या मिश्रणात वेलची, जायफळ, केशर, सुकामेवा आणि आम्रखंड तयार करायचे असेल तर आंब्याचे पल्प (Mango) असे मिश्रण टाकून गोड श्रीखंड पाडव्याला साग्रसंगीत जेवणात सर्व्ह करा.