Gujarat Assembly Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा या पत्रकार परिषदेत होणार असल्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होतील असा अंदाज आहे. त्यामुळे दुपारी होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.
गुजरात निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) दोन टप्प्यात होणार अशी शक्यता आहे. ही प्रक्रिया 4 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. भाजप गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत आहे आणि पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान, आज निवडणूक आयोगाच्या (EC) पत्रकार परिषदेत गुजरातच्या निवडणुकीच्या हंगामाचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्येही पूर्वीप्रमाणेच दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दुसरीकडे, मतदानाबाबत बोलायचे झाल्यास, पहिल्या टप्प्याचे मतदान नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान डिसेंबरच्या सुरुवातीच्या तारखांमध्ये होऊ शकते.
जिथे निवडणूक आयोग आज 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, त्याच्या दोन तास आधी सकाळी 10 वाजता गुजरात भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटीलही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत तिकीट वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे.
निवडणूक आयोग गुजरातमध्ये 1 डिसेंबर आणि 4 डिसेंबरलाही निवडणुका घेऊ शकतो. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. खरे तर निवडणुकीसाठी संपूर्ण पक्ष एकवटला आहे. असे असले तरी या निवडणुकीतील विजयाची माळ गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत रघुनाश पाटील यांच्या खांद्यावर असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मानले जातात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विक्रमी विजयासह सत्तेत परतण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे आम आमदमी पक्षाने येथे जोर लावला आहे. काँग्रेसची इथं चांगली ताकद दिसून आली आहे. आधीच्या निवडणुकीत थोडक्यात काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली. तर यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीपासून प्रचारावर जोर देत खरी चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे भाजपच्या हातातून सत्ता जाणार का की राहणार, याची मोठी उत्सुकता आहे.