गुजरात : गुजरात निवडणूकीत कॉंग्रेसने मुसंडी मारत जोरदार आघाडी मिळवली आहे. गुजरातमध्ये आकडा ९२ असून कॉंग्रेस ८९ जागांवर आघाडीवर होती. तर भाजपा ८३ जागांवर आघाडीवर होते. पण नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार भाजपा ८९ तर कॉंग्रेस ८८ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री रुपाणी राजकोट पश्चिम मधून १८०० मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका पार पडल्या. या मतदानाची एकूण मतमोजणी आज (सोमवार) पार पडत आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले होते. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला गेला.