'आम्ही सामान्य आहोत, तुझ्यासारखं...', रश्मिका मंदाना रणबीर कपूरला स्पष्टच बोलली

Rashmika Mandanna- Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं असं काय केलं की रश्मिका स्वत: ला म्हणाली सर्वसामान्य...

दिक्षा पाटील | Updated: Feb 21, 2025, 02:11 PM IST
'आम्ही सामान्य आहोत, तुझ्यासारखं...', रश्मिका मंदाना रणबीर कपूरला स्पष्टच बोलली
(Photo Credit : Social Media)

Rashmika Mandanna- Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनं रणविजय या भूमिकेतून सगळ्यांना त्याची एक वेगळी बाजू दाखवली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसली होती. तिनं गीतांजली ही भूमिका साकारली. रणबीर कपूरनं असं काही केलं की रश्मिका मंदाना ही भावूक झाली होती. याचा खुलासा स्वत: रश्मिका मंदानानं 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या सेटवर किस्सा सांगत असताना केला आहे. त्याशिवाय तिनं स्वत: ला रणबीरसमोर सामान्य म्हटलं आहे.

रश्मिकानं ही मुलाखत मॅशबेल डॉट इंडियाला दिली होती. या मुलाखतीत रश्मिका  'अ‍ॅनिमल' मधील तिची आणि रणबीरची केमिस्ट्री आणि सेटवरील इतर गोष्टींविषयी बोलताना दिसली. त्यावेळी ती म्हणाली," 'अ‍ॅनिमलसाठी', जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा मी माझ्या नाश्त्यावरून तक्रार करत होती की किती बोरिंग आहे. दुसऱ्याच दिवशी रणबीरनं चविष्ट आणि ते ही प्रेमाणे माझ्यासाठी नाश्ता आणला. त्यानं त्याच्या घरून हा नाश्ता आणला होता. त्यानं माझ्यासाठी इतका चविष्ट नाश्ता आणला हे पाहून मला अश्रू अनावर झाले. रणबीर मला म्हणाला की तू इतकं वाईट जेवण का खाते? मी म्हटलं की तुझ्याकडे एक चांगला कूक आहे. आणि आमच्याकडे नाही. आम्ही सर्वसामान्य लोकं आहोत, त्यामुळे आम्ही हैदराबादवरून कूक घेऊन येऊ शकत नाही आणि दुसरं पण नाही." 

रणबीरनं अनेकदा सांगितलं की 'तो त्याचे दिवंगत वडील ऋषी कपूर आणि आजोबा राज कपूर यांच्याप्रमाणे जेवणात वेगवेगळ खाण्याचा हौशी आहे. रश्मिकाची ही गोष्ट ऐकूण हे स्पष्ट झालं की फक्त रणबीरलाच नाही तर त्याच्या घरातील टेस्टी जेवणं हे त्याच्या सह-कलाकारांना देखील आवडतं. 

हेही वाचा : 'मी वारस देऊ शकली नाही...', स्मृती ईराणींच्या आईनं 3 मुलींसोबत सोडलं होतं घर; 41 वर्षांनंतर घर खरेदी करायला गेल्यावर...

दरम्यान, रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिचा सध्या 'छावा' या तिच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील आहे. या चित्रपटात ती विकी कौशलसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. लवकरच ती  रणबीर, विक्की आणि आलिया भट्टसोबत संजय लीला भन्साळींच्या 'लव एंड वॉर' मध्ये दिसणार आहे. त्यासाठी ती आता तयारी सुरु करणार आहे.