Mystery Girl Video Viral : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा 19 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. पाकिस्तान आणि UAE च्या भूमीवर याचे सामने रंगणार आहेत. दरम्यान या मेगा इव्हेंटमध्ये सोशल मीडियावर एका मिस्ट्री गर्लचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मिस्ट्री गर्लने आपल्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे. अचानक ही मिस्ट्री गर्ल इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. सामन्यासोबत या मुलीच्या लूकने तिच्या चाहत्यांच्या हृदयाच्या ठोके वाढवले आहे. शिवाय तिच्या सुंदर हास्याचा व्हिडीओने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून पाकिस्तानी मॉडेल अरिफा जुनैद अंजुम आहे. अरिफा जुनैद अंजुम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत अली आहे. अरिफा जुनैद अंजुमचे इंस्टाग्रामवर ४० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अरिफा जुनैद अंजुम ही पाकिस्तानची फॅशन मॉडेल आहे. अलीकडे, 14 फेब्रुवारी रोजी, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यादरम्यान, अरिफा जुनैद अंजुम टीव्ही स्क्रीनवर अनेकदा दिसली. यानंतर अरिफा जुनैद अंजुम रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. संपूर्ण सामन्यादरम्यान, कॅमेरामन अरिफा जुनैद अंजुमवर सतत लक्ष केंद्रित करत होता, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आणि ती काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होत स्टार बनली.
हे ही वाचा: पाच विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने कोणाला दिले 'फ्लाइंग किस'? खेळाडूने स्वतःच दिले स्पष्टीकरण
अरिफा जुनैद अंजुमच्या निरागसतेने आणि सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे. तर काहींनी सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूंऐवजी अरिफा जुनैद अंजुमवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल कॅमेरामनला फटकारले आहे. कराचीची रहिवासी असलेली अरिफा जुनैद अंजुम सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिने फॅशन मॉडेल म्हणूनही काम केले आहे.
हे ही वाचा: Champions Trophy 2025: अखेरीस तिरंग्याच्या वादावर पाकिस्तानने गुडघे टेकले, कराचीमध्ये झळकला भारताचा ध्वज
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर आता पाकिस्तानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे.
हे ही वाचा: टीम इंडियातील दिग्गजावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावलं; Champions Trophy सोडून मायदेशी परतला
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी, पाकिस्तानला 23 फेब्रुवारीला भारताविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. भारताविरुद्धचा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी खूप कठीण असेल. पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धचा सामना हरल्यास उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अ गटात न्यूझीलंड संघ २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडचा निव्वळ रन रेट +1.200 आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचा निव्वळ रन रेट -1.200 आहे. अ गटात भारत २ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा निव्वळ रन रेट +0.408 आहे.