आठवीतल्या मुलीला वर्गात हार्टअटॅक, उपचाराआधीच मृत्यू... धक्कादायक Video व्हायरल

Heart Attack Viral Video : आठवीतल्या एका मुलीला वर्गात शिकत असताना हार्टअटॅक आल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. 

राजीव कासले | Updated: Sep 30, 2023, 07:28 PM IST
आठवीतल्या मुलीला वर्गात हार्टअटॅक, उपचाराआधीच मृत्यू... धक्कादायक Video व्हायरल title=

Heart Attack Viral Video : गेल्या काही काळात हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक घटना समोर आल्या आहेत. व्यायाम करताना, नाचताना किंवा शाळेत शिकताना हार्टअटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. अगदी धडधाकट व्यक्ती चालताबोलता मृत्यूमुखी पडतेय. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन आणि तरुणांमध्ये हार्टअटॅकचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलंय. अशीच एक धक्कादाक घटना समोर आली आहे. गुजरातमधल्या सूरत (Surat) शहरात आठवीतल्या मुलीचा हार्ट अटॅकने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या मुलीला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच त्या मुलीचा मृत्यू झाला. 

सूरतमधल्या गोडादरा इथल्या एका खासगी शाळेत 12 वर्षांची ही मुलगी शिकते. नेहमीप्रमाणे ती शाळेत आली होती. वर्गात शिक्षिका शिकवत होत्या, त्याचवेळी पहिल्या बेंचवर बसलेल्या या मुलीला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ती बेशुद्ध होऊन जमीनवर कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेने वर्गातील इतर विद्यार्थी घाबरले. शिक्षिकेने मुलीला उचलत शुद्धीत आणण्याची प्रयत्न केला. पण मुलगी काहीच हालटचाल करत नसल्याने शिक्षिकेने शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

मन सुन्न करणारा व्हिडिओ
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिक्षिका वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचं दिसतंय. वर्गात पहिल्या बेंचवर एक मुलगी बसलेली व्हिडिओत दिसतंय. अचानक ही मुलगी डाव्या बाजूला झुकताना दिसेतय. त्यानंतर बेशुद्ध होऊन ती जमिनीवर कोसळते. वर्गातल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. 

कुटुंबाला धक्का
अवघ्या 12 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 12 वर्षांच्या मुलीचा हार्टअटॅकने मृत्यू होऊ कसा काय होऊ शकतो, यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीए. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे. 

नववीतल्या मुलाचा अटॅकने मृत्यू
काही दिवसांपूर्वी दिल्लीत नववीतल्या एका मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार वर्गात केमिस्ट्रीचा विषय शिकवला जात होता. त्यावेळी हा मुलगा अचानक बेंचवरुन खाली कोळसला. शिक्षक आणि वर्गातील इतर मुलं तात्काळ त्या विद्यार्थ्याजवळ गेले आणि त्याला प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. पण उपाचारापूर्वीच विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्याआधी पुण्यात क्रिकेट खेळताना एका 14 वर्षांच्या मुलाचा मैदानातच हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.