Rakesh Jhunjhunwala Death : हर्षद मेहता स्कॅमवेळी राकेश झुनझुनवाला यांनी किती कोटी कमावले? ऐका त्यांच्याच तोंडून

90 च्या दशकात शेअर बाजारात हर्षद मेहता नावाचा दबदबा होता. मात्र 1992 साली जेंव्हा हर्षद मेहता स्कॅम समोर आला तेंव्हा त्यांनी शेअर्स शॉर्ट करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले.

Updated: Aug 14, 2022, 12:13 PM IST
Rakesh Jhunjhunwala Death : हर्षद मेहता स्कॅमवेळी राकेश झुनझुनवाला यांनी किती कोटी कमावले? ऐका त्यांच्याच तोंडून title=

Harshad Mehta Scam and Earnings of Rakesh Jhunjhunwala : भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुनझुनवाला ( Rakesh Jhunjhunwala Big Bull of Indian Share Market ) यांचं वयाच्या 62 व्या वर्षी दीर्घ आजारपणाने निधन झालं. राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठी कमाई तर केलीच, सोबतच कमाईचे मोठे रेकॉर्ड्स देखील मोडलेत. 5000 रुपयांपासून त्यांनी शेअर बाजारात सुरुवात केले होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी 5000 रुपयांपासून कोट्यवधींची कमाई केली. 1992 साली झालेल्या हर्षद मेहता ( harshad mehta scam 1992 ) घोटाळ्यावेळी राकेश झुनझुनवाला यांना कोट्यवधींचा नफा झालेला. ही बाब त्यांनी एका मुलाखतीवेळी स्वतः बोलून दाखवलेली  

हर्षद मेहता घोटाळ्यादरम्यान कोट्यवधींची कमाई 

90 च्या दशकात शेअर बाजारात हर्षद मेहता नावाचा दबदबा होता. मात्र 1992 साली जेंव्हा हर्षद मेहता स्कॅम समोर आला तेंव्हा त्यांनी शेअर्स शॉर्ट (share shorting ) करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत ते बेअर ग्रुपचे ( bear group ) सदस्य असल्याचं कबूल केलेलं. त्यांनी शॉर्ट सेलिंग करून मोठ्या प्रमाणात कमाई केलेली. त्याकाळी शेअर बाजारात प्रामुख्याने बुल्स आणि बेअर्स यांचा प्रचंड दबदबा होता. त्याकाळी राकेश झुनझुनवाला यांचं नाव बेअर ग्रुपमध्ये घेतलं जायचं.

बुल्स, बेअर्स आणि लॉन्ग, शॉर्ट म्हणजे काय? 

शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर विकत घेऊन जी कमाई केली जाते त्याला लॉंग करणं म्हणतात. तर शेअर बाजारात शेअर्स विकून जी कमाई केली जाते त्याला शॉर्ट्स म्हणतात. बुल्स हे शेअर्स विकत घेऊन मार्केट वर नेतात. तर बेअर्स हे शेअर्स विकून मार्केट खाली पाडत असतात. 

harshad mehta scam, rakesh jhunjhunwala, how rakesh jhunjhunwala earned in harshad mehta scam, harshad mehta and rakesh jhunjhunwala

harshad mehta scam and earnings of rakesh jhunjhunwala watch what jhunjhunwala said