हरियाणा विधानसभा निकालाने पोलपंडीत पडले तोंडघशी, काँग्रेसच्या पराजयाची कारणे काय?

Harayana Congress Lost Reasons: हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल पोलपंडितांना तोंडघशी पाडणारा ठरला.

Pravin Dabholkar | Updated: Oct 8, 2024, 08:47 PM IST
हरियाणा विधानसभा निकालाने पोलपंडीत पडले तोंडघशी, काँग्रेसच्या पराजयाची कारणे काय? title=
हरियाणामध्ये काँग्रेसच्या अपयशाची कारणे

Harayana Congress Lost Reasons: हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं अक्षरक्षः पानिपत झालंय. काँग्रेसच्या अनेक दिग्गज आमदारांना पराभवाचं तोंड पाहावं लागणार आहे. हरियाणात काँग्रेसचा मोठा विजय होईल असा अंदाज पोलपंडितांनी वर्तवला होता. पण हरियाणाच्या मतदारांनी काँग्रेससह पोलपंडितांनाही तोंडघशी पाडलंय. या निकालानं काँग्रेसवर आत्मचिंतन करण्याची वेळ आलीय.

 पोलपंडितांना तोंडघशी पाडणारा निकाल

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल पोलपंडितांना तोंडघशी पाडणारा ठरला. हरियाणात सत्तापालट होऊन काँग्रेसचं सरकार येणार असा अंदाज पोलपंडितांनी वर्तवला होता. मतमोजणीच्या सुरुवातीचे कलही तसेच आले होते. काँग्रेसनं विजयी थाटात सेलिब्रेशनही सुरु केलं होतं. पण जेव्हा मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्या सुरु झाल्या तसा कल झपाट्यानं बदलला. काँग्रेस पिछाडीवर गेली तर भाजपचा विजयी वारु चौखुर उधळला.हरियाणात अनुकूल वातावरण असतानाही काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची अनेक कारणं सांगितली जातात.

काँग्रेसच्या अपयशाची कारणे

काँग्रेसमधील दीपेंद्र हुड्डा, भुपेंद्र हुड्डा आणि कुमारी शैलजांमधील गटबाजीचा फटका निवडणुकीत बसला.

हुड्डांवर केलेल्या खर्ची-पर्ची भ्रष्टाचाराचा भाजपचा आरोप प्रभावी ठरला.

नायबसिंग सैनींनी 24 पिकांना हमीभाव देऊन शेतकऱ्यांची नाराजी दूर केली.

अग्नीवीर योजनेतील जवानांना रिटायरमेंटनंतर नोकरीचं आश्वासन भाजपनं दिलं.

छोट्या पक्षांनी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी केली.मोदी-शाहांच्या प्रचाराच्या झंझावातामुळं भाजपचा विजय सोपा झाला.

दहशतवाद्यांकडून वडीलांची हत्या; आता लेक आमदार बनून जाणार विधानसभेत; कोण आहे शगून परिहार?

'पराभवाचं विश्लेषण केलं पाहिजे'

हरियाणात काँग्रेसच्या सोळा विद्यमान उमेदवारांचा पराभव झाला त्याचं विश्लेषण करण्याऐवजी काँग्रेसनं निवडणूक आयोगावर खापर फोडण्याचा प्रयत्न केलाय.या पराभवाचं विश्लेषण केलं पाहिजे तसंच पराभवाला कारणीभूत लोकांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी कुमारी शैलजा यांनी केलीय.

पराभवातून खूप काही शिकण्याची गरज 

भाजपसाठी हा निकाल उत्साह वाढवणारा ठरलाय. हरियाणात काँग्रेसचा फेक नरेटिव्ह फेल झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. हरियाणा विधानसभेचा निकाल काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. काँग्रेसनं या पराभवातून खूप काही शिकण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या निवडणुकांमध्ये पुन्हा पराभवाचं तोंड काँग्रेसला पाहावं लागेल.

मोदी-शहा नव्हे,'या' चाणाक्याने भाजपला हरियाणात जिंकवलं! अवघ्या 20 दिवसात पलटवली बाजी