HDFC Bank: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. एचडीएफसी बँकेत खातं असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 1 जानेवारी 2023 पासून मोठा बदल करणार आहे. खातेदारांना मेसेज पाठवून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेनं ग्राहकांना सांगितलं आहे की, क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स आणि फी स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेनं आपल्या अधिकृत वेबसाइटवर या बदलांची माहिती दिली आहे. सहा मुद्द्यांमध्ये बँकेनं याबाबतचा तपशील दिला आहे. बँकेनं काही प्रकारच्या पेमेंटवर शुल्क आकारण्याची तयारी केली आहे. यासोबत फी स्ट्रक्चरमध्येही बदल केला आहे.
- भाड्याच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाही.
- सरकारी व्यवहारांवर काही ठराविक कार्डांवरच रिवॉर्ड पॉइंट मिळतील.
- शिक्षणाशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंटवर मर्यादा घालण्यात आली आहे.
- तनिष्क व्हाउचरच्या रिवॉर्ड पॉइंट्सवरही 50,000 पर्यंत मर्यादा घालण्यात आली आहे.
बँकेने म्हटले आहे की, किराणा व्यवहारावरील रिवॉर्ड पॉइंट्स आता प्रत्येक महिन्यासाठी मर्यादित असतील. वेगवेगळ्या कार्ड्सची रिवॉर्ड सिस्टमही वेगळी असेल. या रिवॉर्ड पॉइंट्सच्या मदतीने तुम्ही भाडे भरणे, फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगचा लाभ घेऊ शकाल.
बातमी वाचा- Salary Calculator: पगार मिळताच तात्काळ करा ही कामं, अन्यथा पैसे खर्च झालेच समजा
बँकेने सांगितले की थर्ड पार्टी मर्चंटच्या माध्यमातून भाड्याचे पेमेंट देखील बदलले जाणार आहे. 1 जानेवारीपासून अशा पेमेंटवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल, असे बँकेने म्हटले आहे. हे शुल्क दुसऱ्या महिन्याच्या भाडे व्यवहारावर ग्राहकांकडून घेतले जाईल.