Health And Wellness Influencers Guidline: सोशल मीडियावर (Social Media) आरोग्यविषयक सल्ले देणाऱ्या इन्फ्लुअर्सवर (Health And Wellness Influencers) आता केंद्र सरकार (Central government) करडी नजर ठेवणार आहे. आता आरोग्यासंबंधित विषयावर माहिती किंवा सल्ले देणाऱ्या सोशल मीडिया स्टार्ससाठी (Instagram Reels) सरकार लवकरच गाइडलाइन जारी करणार आहे. तसंच, या इन्फ्लुअर्सना त्यांची योग्यता सिद्ध करावी लागणार आहे. याच महिन्यापासून केंद्र सरकार काही गाइडलाइन (Central Government Guidline) जारी करण्याची शक्यता आहे. कंज्यूअर अफेअर्सचे सचिव निधे खरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Central Government Guidelines For Health And Wellness Influencers)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, Health And Wellness Influencers बाबतीत केंद्र सरकार कठोर धोरण आखण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार काही सूचना केंद्राकडून जारी करण्यात येणार आहेत. जुलै महिन्यांपासून याची अंमलबजावणी सरकारकडून करण्यात येणार असल्याची सूत्राची माहिती आहे. सरकारच्या गाइडलाइननुसार, आता Influencersना त्यांच्या शिक्षणाविषयी व क्वॉलिफिकेशनबाबत माहिती द्यावी लागणार आहे.
Influencers सोशल मीडियावर पोस्ट करत असताना आता डिस्क्लेमरदेखील द्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही Influencers कोणतेही क्वॉलिफिकेशन नसताना लोकांना आरोग्यविषयक सल्ले व टिप्स देताना दिसत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी म्हणूनच केंद्र सरकारने हा नियम लागू करण्याचे ठरवले आहे.
कोणताही अभ्यास नसताना तसंच, क्वॉलिफिकेशन नसताना लोकांना उलट सुलट माहिती दिल्यामुळं अनेकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याच्या अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळं अशा प्रकारांमुळं लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारने गाइडलाइन्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं अशा प्रकारांना चाप असेल.
अभ्यास व क्वॉलिफिकेशन नसतानाही काही Influencers फॉलेवर्सना आरोग्यविषय टिप्स देतात. तर, काही जण त्यावर विश्वास ठेवून त्या टिप्सचा वापर करतात. मात्र कधीकधी त्याचा उलटा परिणाम होतो. अशी अनेक प्रकरणे समोर आले आहेत. जर केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सचे पालन न केल्यास Influencers ना 10 लाखपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळं सर्व Influencersनी आत्ताच सरकारचा नियम पाळावा, असं आवाहन करण्यात येत आहे.