नवी दिल्ली : हेमा मालिनी (Hema Malini) लोकसभा निवडणूक लढवत आहेत. (Lok Sabha Elections 2019) मथुरामधून त्य़ा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या तिकीटावर लढत असलेल्या हेमा मालिनी सध्या जोरदार प्रचार करत आहेत. शेतात काम करताना देखील त्या दिसत आहेत. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेमा मालिनी यांनी एका वृद्ध महिलेसोबत फोटो काढला. या महिलेच्या डोक्यावर काही लाकडं दिसत आहेत. जी जाळण्यासाठी वापरली जातात.
सोशल मीडियावर यूजर्स या फोटोवरुन त्यांना प्रश्न करत आहेत. एक युजर म्हणतोय की, तुम्ही उज्वला योजना घरोघरी पोहोचवली आहे. तर मग या महिलेला अजूनही चूल का पेटवावी लागत आहे. हेमा मालिनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. हेमा मालिनी कधी ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे तर कधी शेतात काम करताना दिसत आहेत.
मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका ठिकाणी ते जेवत होते आणि एक गरिब महिला चुलीवर जेवन बनवत होती. यावेळी देखील काँग्रेसने उज्वला योजनेवरुन त्यांना घेरलं होतं.
यह मेरा अपना परिवार है, माँ ने खाना बनाकर खिलाया। मैंने अपने हाथों से इन्हें खाना खिलाया और मैं यह मानता हूँ कि इनकी सेवा ही ईश्वर की सबसे बड़ी पूजा है। [2/2]@BJP4India #PhirEkBaarModiSarkar pic.twitter.com/E6ABMFj10w
— Chowkidar Sambit Patra (@sambitswaraj) March 31, 2019