मुंबई : सरकार कांद्यांची वाढती मागणी पाहता मोठ्या प्रमाणात कांद्यांचा साठा करणार आहे. केंद्रीय अन्न आणि औषध मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये सध्या दुष्काळा आहे, यामुळे येत्या काळात कांदे महाग होऊ शकतात. यामुळे दुष्काळी परीस्थिती पाहता सरकारने ५० हजार टन कांद्यांचा बफर स्टॉक करणे सुरू केले आहे.
सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील लासलगावात आशिया खंडातील सर्वात मोठा कांदा बाजार आहे. या बाजारात कांद्यांच्या होलसेल किंमतीत २९ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच ११ रुपये प्रति किलो कांदा झाला आहे. याच दिवशी गेल्या वर्षी कांद्यांची होलसेल किंमत ८.५० रूपये किलो होती.
सुञांच्या माहितीनुसार, प्राइस स्टॅबिलाइझेशन फंड मॅनेजमेंट कमिटी, नाफेडच्या चालू रब्बी हंगामात, ५० हजार टन कांद्याचा साठा करण्यास सांगितले आहे. २३ मेपर्यंत ३२ हजार टन कांद्यांचा साठा झाल्याची माहिती मिळाली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की कांद्यांसोबत सरकार यावर्षी १६.१५ लाख टन डाळींचा देखील साठा करणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश जे प्रमुख कांद्यांचं उत्पादन करणारी राज्य आहेत. या राज्यांमध्ये दुष्काळ पडला आहे.
एका अंदाजानुसार, जूनमध्ये संपणारे चालू पीक वर्ष २०१८-१९ मध्ये कांद्याचे उत्पादन २३.६२ मिलीयन टन होण्याची शक्यता आहे, २०१७-१८ मध्ये हे उत्पादन २३.२६ मिलीयन टन झाले होते. परंतू, दुष्काळाचा विचार केला, तर उत्पादनाचा अनुमान चुकू शकतो.