HMPV ची भारतात एन्ट्री; बंगळुरुतील 3 आणि 8 महिन्यांच्या दोन चिमुकलींना लागण

HMPV Virus India : चीनमधील  HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री झाली आहे. HMPVचा भारतात पहिला रुग्ण आढळला आहे. HMPV व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे नियम देखील लागू केले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 6, 2025, 11:56 AM IST
HMPV ची भारतात एन्ट्री; बंगळुरुतील 3 आणि 8 महिन्यांच्या दोन चिमुकलींना लागण title=

HMPV Virus Report : चीनमध्ये थैमान घालणारा HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 8 महिन्यांच्या चिमुकलीला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. लहान मुलीला ताप आला त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याला HMPVची लागण झाल्याचं समोर समोर आलं आहे. बंगळुरूमध्ये HMPVचा पहिला रुग्ण आढळला असून तिच्यावर उपचार सुरु आहे. 

HMPV व्हायरसचं चीनमध्ये थैमान घातल असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सज्ज झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. तसेच 'घाबरू नका, पण सावध राहा', असा आरोग्य विभागाने नागरिकांना सल्ला दिला आहे. सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले असून स्वच्छतेच्या नियमावली पाळण्याचे देखील देण्यात आली आहे. 

दुसरा लग्न कर्नाटकातील बंगलुरुमध्ये 

HMPV व्हायरसचे दोन रुग्ण सापडले आहेत. पहिला रुग्ण 8 महिन्यांची मुलगी असून दुसरा रुग्ण तीन महिन्यांची रुग्ण आहे. पहिला रुग्ण बंगलुरुत तर दुसरा रुग्ण कर्नाटकमध्ये आढळला आहे. ICMR ने दोन रुग्ण सापडल्याची अधिकृत माहिती दिली आहे. 

2020 साल उजाडलं ते कोरोना व्हायरसच्या भीतीनं. पुढची 3 वर्ष संपूर्ण जग त्याच कोरोनाच्या भीतीखाली जगत होतं. लाखो लोकांचा बळी या कोरोनानं घेतला. आता 2025 साल उजाडलंय. मात्र नव्या वर्षात चीनमध्ये अजून एका व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. चीनमधली परिस्थिती बघून भारतासह संपूर्ण जगालाच धडकी भरली आहे.  नेमकं काय घडतंय चीनमध्ये बघुयात. 

कोरोनाची दहशत सहन केलेल्या नागरिकांनो सावध राहण्याची पुन्हा वेळ आली आहे. कोरोनापेक्षा भयंकर व्हायरसचा सामना करण्यासाठी तयार राहा. कारण बरोबर तीन वर्षानंतर चीनमध्ये आणखी एक नवा व्हायरस आला आहे.  HMPV व्हायरस इतक्या वेगानं चीनमध्ये पसरलाय की इथल्या रुग्णालयात सध्या कधीही न संपणाऱ्या रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. कोरोना महामारीनंतर पुन्हा चीनी लोकांच्या चेहऱ्यावर मास्क चढलेत. मनात पुन्हा मृत्यूची भीती आहे. संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बाब म्हणजे चीनमध्ये सध्या एकावेळी 4 व्हायरस हवेत पसरलेत. 

2020,21 22 मध्ये जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला. जेव्हा कोरोना जगभर पसरत होता तेव्हा त्याला महामारी घोषीत करायला जागतिक आरोग्य संघटनेनं वर्षभराचा वेळ घेतला. आता HMPV व्हायरसबाबतही WHO अजूनही गप्पच आहे. विशेष म्हणजे कोरोना चीनमधून जगभर पसरला. पण चीननं सगळे आरोप फेटाळले. आत्ताही नव्या व्हायरसबाबत चीन शांतच आहे. महत्त्वाचं म्हणजे HMPV व्हायरसच्या संसर्गानंतर चीन सरकारनं अनेक भागात आणीबाणी लागू केलीय. रुग्णालयापासून स्मशानभुमीपर्यंत सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेलेत. त्यामुळं नव्या वर्षात संपूर्ण जगाला नव्या व्हायरसचा धोका आहे का, 2020 नंतर पुन्हा संपूर्ण जग पुन्हा लॉकडाऊनमध्ये जाणार का, हीच भीती जाणकार व्यक्त करत आहेत.