Viral News : शाळेत अनेक वेळा लहान-लहान चुकांकडे शिक्षक लक्ष देत नाहीत. मात्र या लहान चुका मुलांनाही गोंधळामध्ये टाकतात. असे चुकीचे प्रश्न ज्याचं उत्तर कोणीही देऊ शकतं, असाच एक चुकीच्या प्रश्नाचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही प्रश्नपत्रिका शारीरिक शिक्षणाशी निगडीत असून यामध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रश्न आहेत.
या प्रश्नांमध्ये आपण पाहू शकतो की एकदम साधा सोपा प्रश्न आहे. इयत्ता आठवीची दुसरी मासिक चाचणी घेण्यात आली असल्याचं सोशल मीडियावरील या प्रश्नपत्रिकेत दिसत आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये पहिलाच प्रश्न वाचून मुलांचा गोंधळ तर झालाच पण तुम्हीही विचारात पडाल.
प्रयागराज के नामी स्कूल में पहला सवाल ही गलत है, और ऑप्शन भी... बच्चे स्कूल से क्या ही सीख पाएंगे...#ViralPhoto #Prayagraj pic.twitter.com/t64uaCp32O
— alkesh kushwaha (@alkesh_kushwaha) August 28, 2022
पहिला प्रश्न म्हणजे कबड्डी संघात किती खेळाडू असतात?, त्यांचं इंग्रजी पाहिलं तर गोंधळ निर्माण होतो. पेपरमध्ये प्लेअरऐवजी पेअर लिहिलं असून पर्यायही चुकीचे दिले आहेत. यामध्ये 10, 13, 12, 14 असे चार पर्याय दिले आहेत.
कबड्डीमध्ये एका संघात 7 खेळाडू असतात मात्र पर्यायामध्ये असं काही दिसत नाही. ही प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील एका प्रसिद्ध शाळेची असल्याची माहिती समजत आहे.