Viral Video on Social Media : घर कितीही मोठं असो, त्यात कितीही कपाटं असो बरं स्वत:साठी वेगळा खण असो. कपडे ठेवायला जागात पुरत नाहीये ही तक्रार काही केल्या निकाली निघत नाही. माझ्याकडे कपडे नाहीत, असे म्हणत अनेकजण त्यांच्यात्यांच्या परीनं कपडे खरेदी करत असतात. पण, खरी परीक्षा तर ते घरी आणल्यावर असते. कारण, कपडे ठेवायचे कुठे हाच प्रश्न त्यावेळी सर्वांना पडलेला असतो. (how to fold clothes to save space?)
कपडे ठेवण्यासाठी जागा न पुरण्यामागे एकमेव कारण असतं आणि ते म्हणजे नीटनेटकेपणाचा अभाव. वेड्यावाकड्या घड्या घालत, मिळेल तिथे मिळेल ते कपडे ठेवत वेळ मारून देणाऱ्यांपैकीच अनेकजण तुमच्या कुटुंबातही असतील. अशाच मंडळींसाठी एक व्हिडीओ बऱ्याच कामाचा ठरणार आहे. ज्या (Viral Video) व्हिडीओमुळं किमान सणासुदीच्या दिवसांमध्ये वापले जाणारे कपडे तरी व्यवस्थित ठेवण्यात येतील.
पुरुष मंडळींनी तर आवर्जून पाहा हा व्हिडीओ
'प्रतिपदा क्लोथिंग' या इन्स्टाग्राम (instagram) पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जिथं, नेहरु/ मोदी जॅकेट ची घडी नेमकी कशी घालावी याची सोपी आणि योग्य पद्धत दाखवण्यात आली आहे. जेणेकरून ही लहानशी घडी तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. परिणामी पारंपरिक पेहराव आवडतो, पण कपड्यांची घडी करण्याचा व्याप नको असतो अशी तक्रार करणाऱ्यांचीही संख्या कमी होणार आहे. (How to fold clothes especially nehru jacket in a right way watch video)
- सर्वप्रथम जॅकेटची बटणं उघडा.
- त्यानंतर जॅकेटची डावी बाजू त्याच्या उजव्या बाजूमध्ये अशा पद्धतीनं टाका जिथं बाह्यांच्या खाचा एकत्र येतील.
- बाह्या एकत्र आल्यानंतर एक पातळशी घडी तयार होईल.
- त्यानंतर या लांब घडीमध्ये दुमडून एक घडी पाडा. त्याहूनही लहान घडी हवी असल्यास आणखी एकदा दुमडा.
- अशी घडी केल्यामुळं जॅकेटसा ईस्त्री केल्यानंतर दिसणाऱ्या रेषा दिसत नाहीत आणि ही घडी इतकी लहान असते, की तुम्ही ती अगी सहजपणे कपाटात किंवा प्रवासाला जायचं असल्यास तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता.