Diamond Test: जर तुम्ही ज्वेलरी फॅन असाल आणि त्यातही तुम्हाला डायमंड ज्वेलरी आवडत असेल तर हि बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे आणि तितकीच महत्वाची सुद्धा.. तुमच्याकडे असणारी हिऱ्यांचा दागिना खरा आहे कि खोटा हे तुम्ही कास तपासू शकता ? (DIAMOND TEST) तर तुम्हाला मोठा प्रश्न पडेल यासाठी तुम्ही काय कराल. सोनाराकडे किंवा हिरे व्यापाराकडे दाखवाल. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि तुम्ही कठीण वाटणार काम घरच्या घरीच करू शकता तर?
चला तर मग जाणून घेऊया.. (how to know you diamond is real or fake at home tests )
आपल्या तोंडासमोर हिरा ठेवा आणि त्यावर फुक मारा जरा धुक्याप्रमाणे काही ठार तसेच राहिले तर समजा तो हिरा बनावट आहे. हिरा तुमच्या श्वासातळी उष्णता लगेच पसरवून टाकतो ती एक जागी जमा होत नाही.
न्यूज पेपर मेथड (news paper method)
हिरा उलट करा आणि न्यूजपेपरच्या तुकड्यावर ठेवा जर हिऱ्यामधून तुम्हाला न्यूजपेपरवर काय लिहिलं आहे ते वाचता येत असेल किंवा काळे धब्बे दिसत असतील तर तो हिरा नसून बनवता हिरा आहे ले तुम्ही समजून जा. असली हिरा प्रकाशाला इतक्या तीव्रपणे बेंड करतो कि आपल्याला प्रिंट आपण पाहूच शकणार नाही .
पांढऱ्या कागदाच्या तुकड्यावर पेनने एक लहान बिंदू काढा आणि बिंदूच्या मध्यभागी हिरा ठेवा. आणि थेट खाली पाहा. जर तुमचा हिरा नसेल तर तुम्हाला दगडात गोलाकार प्रतिबिंब दिसेल. खर्या डायमंडमधून तुम्ही बिंदू पाहू शकणार नाही.
सेटिंग आणि माउंट तपासा.
वास्तविक हिरा कुठल्याही स्वस्त धातूमध्ये सेट केला जात नाही. तस करण्याची शक्यता कमी आहे. सोने किंवा प्लॅटिनममध्ये विशेष चिन्हांकनमध्येच जडलेला हिरा हा खरा समजला जातो. (10K, 14K, 18K, 585, 750, 900, 950, PT, Plat) हे सर्व चिन्ह असतील तर तुम्ही निशंक व्हा तुमचा हिरा खरा आहे.
हिऱ्याची तपासणी करण्यासाठी ज्वेलर्स लूप वापरा.
तुम्ही सहसा दागिन्यांच्या दुकानातून हा लूप घेऊ शकता उत्खनन केलेल्या हिऱ्यांमध्ये सामान्यतः लहान नैसर्गिक अपूर्णता असतात, ज्याला "inclusions,"म्हणतात, ज्याला लूपने पाहिले जाऊ शकते. खनिजांचे लहान फ्लेक्स किंवा अगदी थोडे रंग बदलसुद्धा यात दिसतात.हि दोन्ही गोष्टी हिरा खरा आहे कि खोटा हे तपासण्यासाठी पुरेश्या आहेत.
टेस्टिंग अनमोल्ड मेथड
असली हिऱ्यामधून त्यांच्यामधून जाणारा प्रकाश झपाट्याने बेंड करतात, त्यामुळे अधिक तेजस्वीपणा दिसतो जे सामान्यतः काच आणि क्वार्ट्जसारखे दगड कमी चमकतात. हिऱ्याची चमक तो कापल्यावरसुद्धा कमी होत नाही ते अशक्य आहे कारण तोच त्याचा मूळ गुणधर्म आहे. चमक पाहून तुम्ही तो असली आहे कि नकली ते सांगता येत.
स्टोन हीटिंग टेस्ट
तुमच्याकडे असणाऱ्या हिऱ्याला लायटरने ३० सेकंड हिट करा आणि ताबडतोब हा हिरा पाण्यात टाका असली हिऱ्यावर याचा काही परिणाम होणार नाही पण जर हिरा नकली असेल तर मात्र तो तुटेल किंवा आकुंचल पावेल.
तर या काही सोप्या स्टेप्स आहेत जे करून तुम्ही हिरा असली आहे कि नकली ते तपासू शकता. (how to know you diamond is real or fake at home tests )