PF Withdrawal Online: प्रत्येकजण आपली बचत वाढवण्यासाठी, निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतो. भविष्य निर्वाह निधी (PF) हा एक स्वयंसेवी गुंतवणूक निधी आहे. हा निधी व्यक्तींना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतो. ही सरकार-व्यवस्थापित सेवानिवृत्ती बचत योजना कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग मासिक आधारावर या पेन्शन फंडामध्ये योगदान देण्यास सक्षम करते. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पगारातून एक ठरावीक रक्कम पीएफ खात्यात जमा होते. सेवानिवृत्ती किंवा नोकरी संपुष्टात आल्यावर एकरकमी पेमेंटच्या स्वरूपात पैसे सहज उपलब्ध होतात. पीएफ रक्कम ही तुमच्या संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे तुमचा निवृत्ती निधी जलद गतीने वाढण्यास मदत होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून गठित केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) नियंत्रित आणि व्यवस्थापित करते. या मंडळात मालक, कर्मचारी आणि सरकारचे प्रतिनिधी असतात.
अनेकदा लोक निवृत्तीपूर्वीच पीएफची रक्कम काढू इच्छितात. पीएफचे पैसे अनेक प्रसंगी काढता येतात. मात्र, ऑनलाइन पद्धतीने पीएफचे पैसे काढल्याने लोकांना भरपूर फायदा मिळू शकतो आणि पीएफचे पैसेही सहज काढता येतात.
बातमी वाचा- Cancer Insurance Policy अंतर्गत कर्करोगशी संबंधित जोखीम होणार कव्हर, जाणून घ्या सर्वकाही