सुटीचा दिवस झोपण्यात घालवू नका, अशा प्लॅनिंगने सेलिब्रेट करा स्वातंत्र्य दिन!

Independe Day 2023: इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947  रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 12, 2023, 07:15 AM IST
सुटीचा दिवस झोपण्यात घालवू नका, अशा प्लॅनिंगने सेलिब्रेट करा स्वातंत्र्य दिन! title=
Independence Day 2023 unique ways to celebrate the day with your family

Independe Day 2023: 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी समस्त देशप्रेमी उत्सुक असतात. या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक सोसायट्यांमध्ये तर गावातील ग्रामपंचायतींमध्येही मोठ्या उत्साहात ध्वजारोहण केले जाते. 15 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर केली जाते. त्यामुळं अनेक जण घरीच असतात. मग अशावेळी सकाळी ध्वजारोहण केल्यानंतर उरलेला दिवस कसा घालवायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. मग 15 ऑगस्टला तुमचा दिवस खास पद्धतीने प्लान करा. 

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते. यंदा 2023 मध्ये भारत 77वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची तयारीही सुरू झाली आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ही नेशन फर्स्ट, ऑल्वेज फर्स्ट (राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम) अशी आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करत असताना तुम्ही या गोष्टीही ट्राय करुन बघू शकता. 

ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. प्रत्येक भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा असतो. मात्र प्रत्येकलाच या क्षणाचे साक्षीदार होता येत नाही. पण तुम्ही जिथे राहता तिथे आवर्जुन ध्वजारोहणासाठी उपस्थित राहा. सहकुटुंब उपस्थित राहून तुम्ही तिरंगा फडकवा. जर तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे जमत नसेल तर घरीच तुम्ही छोटासा तिरंगा फडकावू शकता व राष्ट्रगान म्हणून आपल्या देशाप्रती प्रेम व्यक्त करु शकता. मात्र, एक गोष्ट ध्यानात असू द्या की घरात फडकावलेला तिरंगा उतरवताना तिरंग्याचा मान राखला जावा. 

कुटुंबासोबत विकेंड ट्रिप प्लान करा

15 ऑगस्टदिवशी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही मोठी ट्रिप प्लान करु शकता. यंदा 15 ऑगस्टच्या आधी शनिवार आणि रविवारची सुट्टी जोडून आली आहे. मध्ये एक सोमवारची सुट्टी टाकून  तुम्ही चार सुट्ट्या घेऊन कुटुंबासोबत मोठी सुट्टी प्लान करु शकता. 

देशभक्तीपर चित्रपट पाहा

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांना नमन म्हणून तुम्ही काही देशभक्तीपर चित्रपट किंवा डॉक्युमेंट्री पाहू शकतात. रंग दे बसंती, लगान, बॉर्डर, मंगल पांडे, मणिकर्णिका सारखे चित्रपट तुम्ही कुटुंबासह पाहू शकतात. 

पर्यावरणाप्रती प्रेम

पर्यावरणाचे ढासळते संतुलन, हवामान बदलाचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्यामुळं पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी या स्वातंत्र्यदिनाला एक शपथ घेऊया. या दिवशी एक झाड लावून  देशाप्रती आदर व्यक्त करु शकता. जर तुम्हाला झाडे लावणे शक्य नसेल तर तुम्ही देश स्वच्छ ठेवण्याची शपथ घेऊ शकता.