देशात कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाखांवर

कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. 

Updated: Aug 31, 2020, 10:06 AM IST
देशात कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाखांवर  title=

मुंबई : कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ७८ हजार ५१२ नव्या रुणांची नोंद झाली असून ९७१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३६ लाख २१ हजार २४६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून ६४ हजार ४६९ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ८१ हजार ९७५ रुग्णांवर उपचार सुरू असून २७ लाख ७४ हजार ८०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  

शिवाय महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ७,८०,६८९ एवढी झाली आहे. यापैकी १,९३,५४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत २४,३९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.