क्रिकेटचा देव सचिन आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यात असलेलं आई-मुलाचं नातं माहितेय का?

लता दीदींचं (Lata Mangeshkar) जितकं गाण्यावर प्रेम होतं तितकंच प्रेम हे क्रिकेटवर (Lata Mangeshkar Cricket) दुप्पट तिप्पट प्रेम होतं.

Updated: Feb 6, 2022, 04:02 PM IST
क्रिकेटचा देव सचिन आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यात असलेलं आई-मुलाचं नातं माहितेय का? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : भारतरत्न, गानकोकिळा आणि......, ज्यांना असंख्य विशेषणं कमी पडतील अशा आमच्या तुमच्या लाडक्या लता दीदींचं आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय. दीदींचं जितकं गाण्यावर प्रेम होतं तितकंच किंवा त्यापेक्षा अधिक हे क्रिकेटवर दुप्पट तिप्पट प्रेम होतं. (indian cricketer master blaster sachin tendulkar had said aai to legendary senior singer lata mangeshkar see video) 

दीदींच क्रिकेटवर असलेलं प्रेम हे जगजाहीर होतं. लता दीदी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमध्ये जगातील सर्वात मोठं नातं होतं. ते म्हणजे आई आणि मुलाचं. सचिनने एका कार्यक्रमात लता दीदींचा तुम्ही माझ्या आई आहेत, असा उल्लेख केला होता. ज्यानंतर दीदींनी सचिनच्या आग्रहाखातर 'तू जहाँ जहाँ चलेगा' हे गाणं गायलेलं. यानतंर हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

नक्की संपूर्ण किस्सा काय?

त्याच झालं असं की, सचिनने शतकाचं शतक पूर्ण केलं. सचिनने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्याचा गौरव करण्यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात दीदींनी मंचावर सचिनच्या आठवणींना उजाळा दिला. दीदींनी आठवणी सांगितल्या. यानंतर खाली विविध क्षेत्रातील लोकांमध्ये बसलेल्या सचिनने दीदींकडे त्याचं आवडतं गाणं गाण्याची इच्छा व्यक्त केली. दीदींनी ही इच्छा पूर्ण करत गाणं गायलं होतं.

नक्की काय झालं होतं? 

या कार्यक्रमात लता दीदींनी मंचावरुन सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. दीदींनी सचिनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्साही यात सांगितला. "पहिल्या भेटीत सचिनने माध्यमांसमोर माझ्याबाबत मी माझ्या आईबाबत  काय बोलणार, अशी प्रतिक्रिया दिली होती", असं दीदींनी या विशेष कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. 

एका दिग्गज जगविख्यात क्रिकेटपटूने आपल्याला आईचा दर्जा दिल्याने आईचा मान दिला. हा किस्सा सांगताना लता दीदी भारवल्या होत्या.
 
दीदींचं बोलणं पूर्ण झालं. त्यानंतर सचिनने दीदींकडे सुनील दत्त आणि साधना यांच्या मेरा साया सिनेमातील 'तु जहाँ जहाँ चलेगा' हे गाणं गावं, अशी विनंती केली. यावर दीदींनी मी थोडी उत्साही आहे. त्यामुळं मला हे गाणं म्हणता येईल की नाही माहित नाही, असं म्हणत दीदींनी गाणं गायलं. दीदींच्या निधनानंतर हा व्हीडिओ आता पुन्हा एकदा व्हायरल होतोय.