लांब पल्ल्याचा प्रवास करताना असं मागवा चविष्ट जेवण; Indian Railway देतेय खास सुविधा

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा प्रवासाचे तास जास्त असतील तर, अनेकजण खाण्यापिण्याची सोय करूनच जातात. काहीजण मात्र रेल्वेतून मिळणाऱ्या अन्नपदार्थांवर अवलंबून राहतात.   

सायली पाटील | Updated: Sep 25, 2023, 02:52 PM IST
लांब पल्ल्याचा प्रवास करताना असं मागवा चविष्ट जेवण; Indian Railway देतेय खास सुविधा  title=
Indian railway how to order food in train journey

Indian Railway Food : रेल्वे प्रवास करताना सहसा आपण बऱ्याच गोष्टींची पूर्वतयारी करून निघतो. त्यातही प्रवास मोठा असल्यास सुका खाऊ, जेवणाचा डबा ही अशी तयारीही केली जाते. एकिकडे काहीजण आजही रेल्वे प्रवासासाठीचा डबा घरूनच आणतात. तर, काहीजण रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या Meal मधूनच जेवण घेतात. पण, हे जेवण सर्वांच्यात पसंतीस पडतं असं नाही. अनेकदा काही मंडळींना प्रवासातही आपआपल्या आवडीचच जेवण हवं होतं पण, इथं प्रश्न उदभवतो की रेल्वेत जेवण आणून कोण देणार? 

जेवण मागवा एका क्लिकवर... 

railrecipe.com या संकेतस्थळाच्या मदतीनं तुम्ही एका क्लिकवर जेवण मागवू शकता. ही IRCTC चीच एक Sister Company असून, FSSAI कडून प्रमाणित ठिकाणांहून तुमच्यापर्यंत चविष्ट जेवण पोहोचवण्याचं काम ही कंपनी करते. तुम्हालाही पुढच्या प्रवासात रेलरेसिपीकडून जेवण मागवायचं झाल्यास तुम्हाला इथं पदार्थांचे अनेक पर्यायही उपलब्ध असणार आहेत. 

उत्तर भारतीय पदार्थ म्हणू नका किंवा दक्षिण भारतीय पदार्थ, किंबहुना शाकाहारी आणि मांसाहारीसोबतच जैन आणि सात्विक आहाराचे पर्याय तुम्हाला इथं उपलब्ध होतात. कोणत्याही ट्रेनमध्ये, कोणत्याही सीटवर आणि कोणत्याही वेळी तुमच्या प्राधान्यानुसार जेवण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रेलरेसिपी प्रयत्नशील आहे. 

जेवण मागवण्यासाठी काय करावं? 

रेल्वे प्रवासादरम्यान जेवण मागवण्यासाठी प्रवाशांना तीन पर्याय मिळतात. ज्यापैकी एखादा सोयीचा पर्याय निवडून त्यांनी जेवण मागवावं. 
- 8448440386 या क्रमांकावर फोन करून तुम्ही जेवणाची ऑर्डर देऊ शकता. 
- रेलरेसिपी अॅप डाऊनलोड करून जेवणाची ऑर्डर प्लेस करता येते. 
- जेवणाची ऑर्डर देण्यासाठी तुम्ही  railrecipe.com या संकेतस्थळावर जाऊन तिथूनही Order Place करु शकता. 

हेसुद्धा वाचा : बाऊंड्री लाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा 'हा' माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये? 

 

रेल्वेक्रमांकाच्या मदतीनं जेवण ऑर्डर करण्याची सुविधाही इथं प्रवाशांना मिळते. जिथं किमान प्रतीक्षा वेळ 60 मिनिटांचा आहे. त्यामुळ ऑर्डर ही तासभर आधीच देणं सोयीचं. 

  • - www.railrecipe.com ही वेबसाईट सुरु करा किंला रेलरेसिपी अॅप डाऊनलोड करा. 
  • - आता तिथं तुमचा पीएनआर क्रमांक द्या. 
  • - पीएनआर दिल्यानंतर order now पर्याय निवडा. 
  • - तुमच्या प्रवासाची माहिती देऊन जेवणाच्या Delivry साठी एका रेल्वे स्थानकाची निवड करा. 
  • - यादीतून तुम्हाला हवा असलेला पदार्थ खा आणि त्यानंतर Payment Mode निवडा. काही वेळातच तुमचं जेवण तुमच्यापर्यंत पोहोचेल.