Indigo Sale: 2024 या वर्षाला निरोप देण्याची लगबल असतानाच अनेकजण नव्या वर्षाच्या अर्थात 2025 या वर्षाच्या स्वागतासाठीसुद्धा सज्ज होत आहेत. या साऱ्यामध्ये प्रवासाचे एकाहून एक सरस बेत आखले जात आहेत. सुट्ट्यांची जुळवाजुळव करण्यापासून ते अगदी प्रवासासाठीचे बुकिंग करेपर्यंत सारंकाही लगबगीनं केलं जात आहे. या साऱ्यामध्ये प्रवास नेमका रेल्वेनं करावा की विमानानं? अशाही द्विधा मनस्थितीत अनेक मंडळी आहेत.
या सर्व मंडळींचं काम आणखी सोपं करण्यासाठी आता इंडिगो ही विमानसेवा देणारी कंपनी सज्ज झाली आहे. सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात विमानप्रवासाची सुविधा देणाऱ्या इंडिगो कंपनीकडून एक कमाल ऑफर सादर करण्यात आली आहे. ‘गेटअवे सेल’ (Getaway Sale) अंतर्गत प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास तिकीटांवर घसघशीत सवलत दिली जात आहे.
अवघ्या काही तासांसाठीच ही सवलत सुरू राहणार असून, तातडीनं तिकीट बुकींग करणाऱ्यांचा फायदाच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 25 डिसेंबरपर्यंत तिकीट बुकिंग केल्यास 23 जानेवारी ते 30 एप्रिल 2025 दरम्यान कुठेही प्रवास करण्याची मुभा सवलतीच्या दरात दिली जाणार आहे. राहिला प्रश्न तिकीटदरांचा, तर इथं विमानप्रवासाची तिकीटं 1199 रुपयांपासून उपलब्ध असणार आहेत, तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचं तिकीट 4499 रुपयांना उपलब्ध असणार आहे. स्वस्त तिकिटांसह इंडिगोकडून काही इतरही सुविधांवर 15 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे.
विविध कार्ड धारकांनाही इंडिगोच्या या सवलतींचा लाभ घेता येणार आहे. इंडिगोनं फेडरल बँकेच्या जोडीनं एक खास ऑफर जारी केली असून, फेडरल बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना तिकीट दरात अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठी ही सवलत 15 टक्के असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 टक्के इतकी सवलत लागू असेल. हो, पण त्यासाठी तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी तिकीट बुक करणं अपेक्षित असेल, ही ऑफर फेडरल बँकेच्या क्रेडिटकार्ड धारकांना लागू असेल.